ड्रग माफियांविरोधात मोक्का अन्वये कारवाई, गुन्हे शाखेची महाराष्ट्रातील पहिली कारवाई
ड्रग तस्करी करणाऱया माफियांविरोधात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने कठोर पाऊल उचलले आहे. ड्रग तस्करीत सक्रिय असलेल्या तिघांविरोधात सुधारित कायद्यानुसार पोलिसांनी मोक्काअन्वये प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. ड्रग माफियांविरोधात मुंबई गुन्हे शाखेने मोक्काअन्वये केलेली ही महाराष्ट्रातील पहिली कारवाई ठरली आहे.
अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वांद्रे युनिटने मालाडच्या पठाणवाडी येथे अदनान अमिर शेख (24) याला 766 ग्रॅम एमडीसह रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर प्रभारी निरीक्षक विशाल चंदनशिवे व त्यांच्या पथकाने केलेल्या तपासात अदनान हा अन्य दोघांच्या साथीने ड्रग तस्करीच्या धंद्यात सक्रिय असल्याची माहिती मिळाली. आरोपी हे टोळी बनवून ड्रगचा गोरखधंदा करत असल्याचेही निष्पन्न होताच त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यानुसार नव्याने अस्तित्वात आलेल्या सुधारित कलम 2(1), (e), (II) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम अन्वये सदर गुह्यात कलम 3(1) (ii), 3(2) व 3(4) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अन्वये सदरच्या गुह्यात वाढ करून अदनान व त्याच्या अन्य दोघा साथीदारांविरोधात मोक्काअन्वये कारवाई केली आहे. या कारवाईमुळे ड्रग माफियांना मोठा हादरा बसला असून त्यांचे धाबे दणाणले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List