Photo – लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईकरांची लगबग, दादर हाऊसफुल
लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईकरांची लगबग सुरू झाली आहे. अवघ्या काही दिवसांनी गणरायाच थाटामाटात आणि ढोल ताशांच्या गजरात घरोघरी आगमन होणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी आता तयारीला सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे आणि आकर्षक देखावे बनवण्यासाठी तरुणाई कामाला लागली आहे.
(सर्व फोटो – रुपेश जाधव)
रविवार असल्यामुळे मुंबईमधील दादरमध्ये सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी मुंबईकरांनी तुडूंब गर्दी केली.
विविध रंगाच्या फुलांनी दादरच मार्केट बहरून गेलं आहे.
विविध रंगांच्या आणि आकारांच्या माळा घेण्यासाठी गणेशक्तांची धावपळ सुरू होती.
गणरायाला बसण्यासाठी आकर्षक असे मखर बाजारात उपलब्ध झाले आहेत.
दादारमध्ये अनेक दुकानांमध्ये विविध रंगांची फुलं आणि माळा उपलब्ध असल्यामुळे काय घ्यायचं या विचाराने मुंबईकरांची तारांबळ उडली असावी.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List