Konkan Ganeshotsav 2025 – चाकरमान्यांचा प्रवास यावर्षीही हेलकावे खात, महामार्ग रुंदीकरणामागचे शुक्लकाष्ठ संपता संपेना

Konkan Ganeshotsav 2025 – चाकरमान्यांचा प्रवास यावर्षीही हेलकावे खात, महामार्ग रुंदीकरणामागचे शुक्लकाष्ठ संपता संपेना

गणेशोत्सव जवळ आला की, मुंबई-गोवा महामार्गावरून लाखो गणेशभक्तांचा प्रवास सुखकारक होण्यासाठी महामार्ग रुंदीकरणाच्या कामाला वेगाने सुरुवात करायची, हे गेल्या दहा वर्षापासून सुरू आहे. वर्ष 2014 मध्ये झालेल्या महामार्ग रुंदीकरणामागचे शुक्लकाष्ठ संपता संपेना. दरवर्षीच गणेशोत्सवासाठी येणारे भक्त, पर्यटकांसह सर्व प्रवासी हा महामार्ग यंदा तरी गुळगुळीत होईल, अशी अपेक्षा बाळगून असतात; पण दरवर्षीच या उत्सवासाठी या खडबडीत मार्गावरून वाहनांना हेलकावे देत, कष्टप्रद प्रवास येताना आणि जाताना करावा लागतो. आणि मग पुढल्या वर्षी हा प्रवास गुळगुळीत झालेल्या महामार्गावरून होईल, अशी आशा उराशी बाळगूनच भक्ताचा परतीचा प्रवास संपतो.

सुमारे दहा वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडले आहे. त्यामुळे या मार्गावरून एसटी प्रशासनाच्या गाड्या किंवा खासगी गाड्यांमधून प्रवास करताना प्रवाशांचे दरवर्षीच कंबरडे साफ होऊ लागले आहे. गणेशोत्सवापूर्वी महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे अनेक वायदे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दिले जात असले तरीही ते आतापर्यंत पूर्ण करताना प्राधिकरणाच्या नाकीनऊ आले आहेत. काही ठिकाणी ठेकेदारांनी अर्धवट सोडलेली कामे, तर काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम यामुळे प्रवाशांचे गुळगुळीत, तलम महामार्गाचे स्वप्न अजूनही हुलकावणीच दाखवत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात परशुराम घाट ते राजापूर (तळगाव) या सुमारे 158 किलोमीटर महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कामांत अडथळे येत असल्याने रुंदीकरणाचे काम तब्बल अकरा वर्षे सुरू आहे. तरीही जिल्ह्यात येताना मुंबईपासूनच महामार्ग खडतर झाला आहे. सध्या परशुराम घाट ते आरवलीपर्यंत रुंदीकरणाचे काम 94 टक्के झाले आहे. तर राजापूर तालुक्यातही वाकेड ते तळगावपर्यंत जवळजवळ पूर्ण होत आले आहे. मात्र, मधला आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेडपर्यतचे काम 80 ते 85 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. सध्या काम वेगाने सुरू असून डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे. मात्र, आता पाऊस सुरू झाल्याने महामार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात महामार्गावरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या भक्तांचा प्रवास कष्टप्रद होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बस्स झाल्या बैठका! आजपासून जरांगे पाणीही सोडणार, आंदोलन चिघळणार!! सरकारला नवा प्रस्ताव… ‘सरसकट’ची अडचण असेल तर कुणबी ही उपजात समजून आरक्षण द्या! बस्स झाल्या बैठका! आजपासून जरांगे पाणीही सोडणार, आंदोलन चिघळणार!! सरकारला नवा प्रस्ताव… ‘सरसकट’ची अडचण असेल तर कुणबी ही उपजात समजून आरक्षण द्या!
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. त्यावर सरकार अद्याप कोणताही तोडगा काढू शकलेले नाही....
जिनपिंगशी सूर जुळले… मोदींचे चीन चीन चू!
सरकारच्या तिजोरीत खडखडाट, पण तरीही साखर कारखान्यांना चार हजार कोटींची थकहमी; आतापर्यंत किमान चोवीस कारखान्यांना हमी
आली गवर सोनपावली…
सामना अग्रलेख – न्या. नागरत्ना, धन्यवाद!
दिल्ली डायरी – चंद्राबाबू ‘तेलगू बीडा’ उचलणार का?
विज्ञान रंजन – डौलदार लाल फूल!