मतदार यादीतील चुका निवडणुकीआधीच दाखवायला हव्या होत्या!
मतदार फेरतपासणी व मतचोरीच्या मुद्दय़ावरून विरोधकांनी रान पेटवले असताना निवडणूक आयोगाने शनिवारी भूमिका मांडली. ‘मतदार यादीतील चुका राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या आधीच दाखवायला हव्या होत्या,’ असे आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद होणार आहे. तत्पूर्वीच, आयोगाने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. प्रत्येक निवडणुकीच्या आधी राजकीय पक्षांना व उमेदवारांना मतदार यादी दिली जाते. त्यावर हरकती व सूचना मागवल्या जातात. त्यावेळीच यादीतील चुका दाखवणे अपेक्षित आहे. मतदार यादी देण्याचा हेतूच तो असतो. मात्र काही पक्षांनी व त्यांच्या बूथ प्रतिनिधींनी योग्य वेळी याद्या पाहिल्याच नाहीत असे दिसते, असे आयोगाने म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List