बीटचे सेवन आरोग्यासाठी ठरते फायदेशीर, तुमच्या आहारात ‘या’ 6 प्रकारे करा समाविष्ट
आपले आरोग्य तंदुरस्त राहावे यासाठी आपण आपल्या आहारात अनेक आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करत असतो. तसेच अनेकजण डाएट देखील करतो. तसेच चांगल्या आरोग्यासाठी बीटाचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आपल्यापैकी अनेकजण बीटाचे सेवन करणे टाळतात. तर काहीजण सॅलडमध्ये बीट मिक्स करून त्याचे सेवन करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की ते एक सुपरफूड आहे? त्यात मॅंगनीज, पोटॅशियम, लोह, फोलेट, व्हिटॅमिन बी6, सी आणि ए सारखे आवश्यक पोषक घटक असतात.
शरीराच्या 10 प्रमुख समस्या दूर करण्यासाठी एक लहान बीट फायदेशीर ठरू शकते. तर बीट हे केवळ रक्त वाढवत नाही तर आतडे स्वच्छ करते, मन तीक्ष्ण करते, त्वचा सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित करते. चला जाणून घेऊया त्याचे आश्चर्यकारक फायदे-
बीटचे सर्वोत्तम फायदे
बीटमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे त्वचेचे सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करतात आणि त्वचेच्या सर्व समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात. त्यात असलेले व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करण्यास मदत करते, जे त्वचा घट्ट आणि मऊ ठेवते.
शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर बीट हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. त्यात मुबलक प्रमाणात लोह असते, जे रक्त वाढवण्यास मदत करते.
बीटमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे शरीराची रोगांशी लढण्याची प्रतिकारशक्ती वाढवते.
यामध्ये असलेले नायट्रेट्स मेंदूमध्ये रक्त प्रवाह वाढवतात, ज्यामुळे मेंदू तीक्ष्ण होतो. तसेच, बेटेन नावाचा घटक मूड सुधारतो आणि नैराश्याला देखील प्रतिबंधित करतो.
बीटमध्ये भरपूर फायबर असल्याने, ते पचनसंस्था सुधारते आणि पोट साफ करण्यास मदत करते.
बीटमध्ये बेटानिन नावाचा घटक असतो, जो कर्करोगाशी लढण्यास मदत करतो. संशोधनात असे आढळून आले आहे की त्याचा रस स्तन, पोट आणि आतड्यांमधील कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करू शकतो.
यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म लिवरला असलेली सुज कमी करते आणि ते निरोगी ठेवतात.
बीट गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. ते केवळ अशक्तपणा रोखत नाही तर गर्भाशयातील बाळाच्या विकासात देखील मदत करते. ते पाठीच्या कण्याशी संबंधित स्पायना बिफिडा या आजाराला देखील प्रतिबंधित करते.
बीटमध्ये असलेले नायट्रेट शरीरात नायट्रिक ऑक्साईड वायू तयार करते, ज्यामुळे रक्त प्रवाह योग्य राखते. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.
बीट मध्ये असलेले व्हिटॅमिन ए दृष्टी सुधारण्यास मदत करते.
बीटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज कमी असतात, जे वजन कमी करण्यास मदत करते.
बीटमध्ये असलेले पोषक घटक
व्हिटॅमिन सी: 6%
पोटॅशियम: 8%
मॅंगनीज: 14%
फोलेट: 20%
फायबर: 3.4 ग्रॅम
कार्बोहायड्रेट्स: 6.7 ग्रॅम
प्रथिने: 1.7 ग्रॅम
बीट कसे सेवन करावे?
कच्चे बीट चिरून ते सॅलडमध्ये मिक्स करून सेवन करा.
बीटाचा हलवा बनवून त्याचे सेवन करा.
बीटापासून पराठा बनवून देखील तुम्ही खाऊ शकता.
बीटापासून शिंकजी तसेच डिटॉक्स ड्रिंक बनवून प्या.
सकाळी रिकाम्या पोटी बीटचा रस प्या.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List