हृदयविकाराच्या तीन तास आधी दिसतात ही लक्षणे, कशी ओळखावी? वाचू शकतो जीव
आजकाल आपण हार्ट अटॅकबाबत नेहमीच ऐकतो. आणि मुख्य म्हणजे सध्याची जीवनशैली पाहता अगदी 30 ते 40 वयातही अटॅक आल्याच्या घटना आपण ऐकतो, पाहतो. पण तुम्हाला माहित आहे का की हार्ट अटॅक येण्याआधी किमान 3 तास आधी आपलं शरीर आपल्याला संकेत देत असतं. पण त्याकडे आपलं लक्ष जातं नाही किंवा ही लक्षणे एवढी गंभीर असू शकतात हे देखील लक्षात येत नाही. पण ही चूक महागात पडू शकते. त्यासाठी हे जाणून घेऊयात की हृदयविकाराच्या तीन तास आधी दिसणारी लक्षणे कोणती आहेत आणि ती कशी ओळखावी? जेणे करून आपण सतर्कपणे डॉक्टरांशी संपर्क साधू शकतो.
हृदयविकाराच्या झटक्याच्या तीन तास आधी दिसणारी लक्षणे:
आपला मेंदू हा असा अवयव आहे जो हृदयविकाराच्या झटक्याची तीन तास आधी जाणीव करून देतो. शरीरात अगदी सूक्ष्म बदल घडले तरी मेंदू आपल्याला लगेच इशारा देतो. जसं की,
छातीत दुखणे किंवा अस्वस्थता:
हे हृदयविकाराच्या झटक्याचे सर्वात सामान्य लक्षण आहे. छातीत दुखणे, दाब, जडपणा किंवा छातीत घट्टपणा जाणवू शकतो. हे दुखणे काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकू शकते किंवा ते कमी-जास्त होऊ शकते.
हात, मान, जबडा किंवा पाठीत वेदना किंवा अस्वस्थता:
वेदना छातीतून हाताकडे (विशेषतः डाव्या हाताकडे), जबड्याकडे, मानेकडे, पाठीकडे किंवा पोटाकडे पसरू शकते.
श्वास घेण्यास त्रास होणे:
श्वास घेण्यास त्रास होणे किंवा धाप लागणे ही हृदयविकाराची आणखी एक सामान्य लक्षण आहे.
मळमळ किंवा उलट्या:
काही लोकांना मळमळ किंवा उलट्या देखील होऊ शकतात.
चक्कर येणे:
चक्कर येणे किंवा हलके डोकेदुखी जाणवू शकते.
अचानक खूप घाम येणे:
थंड आणि चिकट घाम येऊ शकतो.
अचानक अत्यंत थकवा:
काही लोकांना असामान्यपणे थकवा जाणवू शकतो.
अनियमित हृदयाचे ठोके:
हृदयाचे ठोके अनियमित किंवा खूप जलद होऊ शकतात.
तसेच तज्ज्ञांच्या मते STRद्वारे देखील ही लक्षणे समजू शकतात. STR म्हणजे,
S – SMILE (हसायला सांगा)
T – TALK (बोलायला सांगा)
R – RAISE BOTH HANDS (दोन्ही हात वर उचलायला सांगा)
जर ती व्यक्ती या तिनही कृती नीट करू शकली तर ठिक. जर त्यापैकी एक जरी नीट करता आली नाही, तर गोष्ट गंभीर आहे हे लक्षात घ्यावं. तेव्हा त्या व्यक्तीला लगेच हॉस्पिटलमध्ये भरती केल्यास जीव वाचवता येऊ शकतो.
व्यक्तीला जीभ बाहेर काढायला सांगा
जर त्यांनी जीभ सरळ बाहेर काढली, तर ते सामान्य आहेत. पण जर जीभ एका बाजूला वळलेली असेल (उजवीकडे किंवा डावीकडे), तर त्यांना पुढील तीन तासांत कधीही झटका येऊ शकतो हे नक्की होते. डॉक्टर्स सांगतात की ही लक्षणे ओळखून तीन तासांच्या आत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेल्यास, बहुतांश मृत्यू टाळता येतात. जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर त्वरित वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे.
या गोष्टी टाळाव्यात
जर एखाद्या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका येण्याची शंका असेल, तर त्या व्यक्तीला चालू देऊ नका. जिने चढू किंवा उतरण्यास देऊ नये; ऑटोतून हॉस्पिटलमध्ये नेऊ नये.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List