उदय सामंत एकनाथ शिंदेंची जागा घेण्याच्या तयारीत – विनायक राऊत

उदय सामंत एकनाथ शिंदेंची जागा घेण्याच्या तयारीत – विनायक राऊत

उदय सामंत एकनाथ शिंदेंची जागा घेण्याच्या तयारीत आहेत, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत. आज जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित राहणार होते. मात्र त्यांच्या जागी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत उदय सामंत यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. याआधीही फडणवीस यांच्यासोबत अनेकवेळा सामंत यांनी दिल्लीवारी केली आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना विनायक राऊत असं म्हणाले आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना विनायक राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांची जागा उदय सामंत घेण्याच्या तयारीत आहेत. याआधीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उदय सामंत यांनी अनेकवेळा दिल्लीचे दौरे केले आहेत.”

ते म्हणाले की, ” मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे ज्यावेळी रागावून बसले होते, त्यावेळी उदय सामंत यांनी त्यांच्या पक्षातील 20 आमदारांचा गट तयार करून उपमुख्यमंत्रीपद ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना यापुढे दिल्लीवारी करणं डोईजड जाणार आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;