IND vs ENG 4th Test – गंभीर दुखापत होऊनही ऋषभ पंत उतरला मैदानात, सर्व स्तरातून होतंय कौतुक
टीम इंडियाचा स्टार आणि आक्रमक फलंदाज ऋषभ पंतला दुखापतीमुळे डॉक्टरांना 6 आठवडे सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सकाळीच याबाबते वृत्त हिंदुस्थान टाईम्सने दिले होते. परंतु लढवय्या वृत्तीच्या ऋषभ पंतने देशासाठी मैदानात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला असून तो सध्या 42 या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे.
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू आहे. सामन्याच्या पहिल्यात दिवशी ख्रिस व्होक्सच्या यॉर्करवर स्विप मारत असताना चेंडू ऋषभ पंतच्या पायावल आदळला. वेगात चेंडू लागल्यामुळे त्याच्या पायाला गंभीर जखम झाली. त्याच्या पायातून रक्त सुद्धा येत होतं. त्यामुळे त्याला तात्काळ मैदान सोडावं लागलं होतं. तसेच डॉक्टरांनी त्याला सहा आडवड्यांच्या सक्त विश्रांतीची गरज असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या अडचणींमद्ये वाढ झाली आहे. यशस्वी जयस्वाल (58) आणि साई सुदर्शन (61) यांनी अर्धशतकीय खेळी करत संघाची धावसंख्या स्थिर केली. परंतु इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्यात अपयश आल्याने 314 वर सहा विकेट अशी संघाची अवस्था झाली होती.
Rishabh Pant is fighter, a true champion pic.twitter.com/tajS3f3gbW
— Abhay Pratap Singh (बहुत सरल हूं) (@IAbhay_Pratap) July 24, 2025
संघाचा डाव सावरण गरेजंच होतं. या कठीण परिस्थिती ऋषभ पंतने विश्रांती न घेता पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा धाडसी निर्णय घेत सर्वांनांचा आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी चाहत्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याच मैदानात स्वागत केलं. लंगडत लंगडत तो मैदानात उतरला आणि एक प्रकारे संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावर घेतली. ऋषभ पंत सध्या 42 या धावसंख्येवर नाबाद फलंदाजी करत आहे. सध्या टीम इंडियाने 8 गड्यांच्या मोबदल्यात 337 धावा केल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List