आता पुरुषांसाठी आली गर्भनिरोधक गोळी, कंडोम,नसबंदीनंतर आता तिसरा पर्याय येणार
महिलांसाठी बर्थ कंट्रोलसाठी अनेक पर्याय आहेत. मात्र पुरुषांसाठी केवळ कंडोम आणि नसबंदीसारखे दोनच पर्याय सध्यातरी आहेत. लवकरच आता त्यात आणखीन एक पर्याय येणार आहे. संशोधक पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी म्हणजेच बर्थ कंट्रोल पिल्स तयार करत आहेत. या गोळ्यांची मानवावर केलेली पहिली चाचणी यशस्वी झाली आहे.
16 लोकांवर केलेली चाचणी यशस्वी
पुरुषांसाठी तयार केलेली गर्मनिरोधक गोळी स्पर्म बनवण्याची प्रक्रीया थोड्या काळासाठी थांबवते. सध्या या पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळ्या चाचण्यांच्या पातळीवर आहेत. या चाचणीत सोळा लोकांचा गट घेण्यात आला. त्यांच्यावर या गोळीचा परिणाम तपासण्यात आला. या गोळ्यांचा कोणताही गंभीर साईड इफेक्ट आढळला नाही. परंतू ही गोळीचा कोणताही साईड इफेक्ट पाहायला मिळाला नाही. आता आणखी मोठ्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. यात सेफ्टी आणि परिणाम या दोन्हींची तपासणी केली जाणार आहे.
पुरुषांसाठी वाढते ऑप्शन
सध्या पुरुषांसाठी केवळ कंडोम आणि नसबंदी असे दोन ऑप्शन आहेत. कंडोमचा वापर वारंवार करावा लागतो. आणि नसबंदीचा पर्याय हा कायम स्वरुपी असल्याने त्यातून पुन्हा बाहेर पडता येत नाही.परंतू YCT-529 नावाची ही गोळी पुरुषांसाठी नवा आणि सोपा पर्याय साबित होऊ शकते. पुरुषातील शुक्राणू बनवण्याची प्रक्रीया ही गोळी तात्पुरत्या स्वरुपात बंद करते. ही गोळी बंद केल्यानंतर 4-6 आठवड्यानंतर पुरुषांची फर्टीलिटी पुन्हा परत येते.
शरीरात कशी काम करते YCT-529 गोळी
आपल्या शरीरात एक प्रोटीन असते. ज्याला की रेटिनॉईक एसिड रिसेप्टर अल्फा म्हटले जाते. हे प्रोटीन शुक्राणू तयार करण्यात महत्वाची भूमिका पार पाडत असते. हा एक टाळ्यासारखे काम करतो. ज्यात रेटिनॉईक एसिड चावीचे काम करते. जेव्हा चावी टाळ्यात लागते तेव्हाच शुक्राणू निर्मितीची प्रक्रीया सुरु होते.
YCT-529 गोळी रेटिनॉईक एसिडच्या निर्मितीला रोखू शकते,त्यामुळे शुक्राणू तयार होण्याची प्रक्रीया थांबते आणि त्यामुळे पुरुष अस्थायी स्वरुपात मुल जन्माला घालू शकत नाही. म्हणजेच नंपूसक होतो. ही गोळी हार्मोनवर कोणताही परिणाम करत नाही, ज्यामुळे हार्मोन बदलाने मूड स्विंग्स, किंवा यौन इच्छा कमी होणे, किंवा अचानक वजन वाढणे अशा कोणत्याही स्वरुपाचा साईड इफेक्ट या गोळीने होत नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List