जेवणात चिकन आणि चायनीज नाही वाढलं म्हणून पतीकडून पत्नीच्या हत्येचा प्रयत्न, पोलिसांकडून अटक
जेवणात चिकन आणि चायनीज नाही वाढलं म्हणून एक पती आपल्या पत्नीच्या जिवावर उठला होता. पतीने पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पण दैव बलवत्तर म्हणून पत्नीचा जीव वाचला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी बुधवारी अजय अरुण दाभाडे या व्यक्तीला त्याच्या पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली. रात्रीच्या जेवणात चिकन व चायनीज शिल्लक नव्हते म्हणून अजयने आपल्या पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ३ जुलै रोजी ट्रॉम्बे कोळीवाडा येथील त्यांच्या घरी ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय दाभाडे याने वादाच्या दरम्यान लोखंडी सळईने पत्नी स्वाती दाभाडे (वय 37) यांच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात स्वाती जबर जखमी झाल्या, त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List