अर्भकाला रस्त्यात फेकणाऱ्या निर्दयी बापाला अटक, पोलिसांनी केली 24 तासांत गुन्ह्याची उकल

अर्भकाला रस्त्यात फेकणाऱ्या निर्दयी बापाला अटक, पोलिसांनी केली 24 तासांत गुन्ह्याची उकल

नवजात अर्भकाला रस्त्यात फेकून पलायन करणाऱ्या निर्दयी बापाला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. पनवेल शहरातील तक्का गावात एका बास्केटमध्ये हे अर्भक शनिवारी आढळून होते. मला माफ करा आम्ही हे मूल संभाळू शकत नाही, अशी चिठ्ठी या बास्केटमध्ये सापडली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासांच्या आत या अर्भकाच्या बापावर झडप घालून या गुन्ह्याची उकल केली आहे.

पनवेलमध्ये स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडल्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती. हा गुन्हा संवेदनशील असल्याने गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंदे भारंबे, अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी या आरोपीला तातडीने पकडण्याच्या सूचना तपास पथकाला दिल्या. त्यानुसार तपास यंत्रणा कामाला लागली.

आरोपीने घटनास्थळी कोणताही पुरावा ठेवला नव्हता. या पथकाने आरोपीने वापरलेल्या वाहनाचा मागोवा घेऊन थेट भिवंडी गाठली आणि आमन कोंडकर या निर्दयी बापावर झडप घातली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे, अभयसिंह शिंदे, लवकुश शिंगाडे यांनी 24 तास तपास करत छडा लावला.

विवाहबाह्य संबंधातून जन्म

पनवेल येथील तक्का गावात बेवारस आढळून आलेल्या अर्भकाचा पिता हा आमन कोंडकर आहे. या अर्भकाचा जन्म विवाहबाह्य संबंधातून झाला आहे. त्यामुळे हे अर्भक आरोपीने पनवेल येथे आणले. तक्का गावातील स्वप्नालय अनाथालायच्या रस्त्यावर एका बास्केटमध्ये अर्भक ठेवून त्याने पळ काढला होता, असे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;