पुण्याहून हैदराबादला जाणारे इंडिगोचे विमान विजयवाडा येथे वळवले, कारण काय?
पुण्याहून हैदराबादला जाणारे इंडिगोचे विमान विजयवाडा येथे वळवण्यात आले. सर्व प्रवासी सुखरुप आहेत. हैदराबादच्या हवाई हद्दीत प्रचंड एअर ट्रॅफिक असल्याने विमान विजयवाडाला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. हैदराबादमधील हवाई परिस्थिती सामान्य होईपर्यंत विमान विजयवाडा येथेच राहिल.
इंडिगोचे 6ई-6473 या विमानाने नियोजित वेळेनुसार रविवारी सकाळी 8.43 वाजता हैदराबादसाठी उड्डाण घेतले. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान लँड होणार होते. मात्र हैदराबादच्या हवाई हद्दीत प्रचंड ट्रॅफिक असल्याने हैदराबाद एअर ट्रॅफिक कंट्रोलने दिलेल्या माहितीनंतर वैमानिकाने हा निर्णय घेतला. यानंतर विमान विजयवाडा येथे सुरक्षितपणे उतरवण्यात आले आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. सध्या इंडिगोकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List