पुत्रवियोगाचा धक्का सहन नाही झाला, मुलाच्या तेराव्या दिवशी मातेनेही सोडले प्राण

पुत्रवियोगाचा धक्का सहन नाही झाला, मुलाच्या तेराव्या दिवशी मातेनेही सोडले प्राण

केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेले जयपूरचे पायलट राजवीर सिंह चौहान यांच्या कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजवीर यांच्या तेराव्याच्या दिवशीच त्यांच्या आई विजयलक्ष्मी चौहान यांचेही निधन झाले. आपल्या तरुण मुलाच्या मृत्यूने खचलेल्या विजयलक्ष्मी तेराव्याच्या धार्मिक विधी पार पाडत होत्या, तेवढ्यात त्यांना छातीत अचानक दुखू लागले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना लगेच रुग्णालयात नेले, पण अर्ध्या वाटेतच चौहान यांनी प्राण सोडले.

राजवीरचे मित्र सूरज यांनी दिलेल्या माहितीनुसार राजवीरच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला होता. शनिवारी मोठ्या शोकाकूल वातावरणात राजवीर यांच्या तेराव्याच्या विधी सुरू होत्या. विजयलक्ष्मी त्या दिवशी पहाटे लवकर उठल्या आणि आमंत्रितांसाठी स्वतःच्या हाताने जेवन बनवत होत्या. त्याचवेळी बीकानेरहून काही नातेवाईक आले, ते पाहून त्या भावुक झाल्या आणि जोरजोराने रडू लागल्या. तेवढ्यात त्यांच्या छातीत तीव्र वेदना झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले गेले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आपल्या तरुण मुलाचे अकालीच निधन झाले त्यामुळे विजयलक्ष्मी यांना हा धक्का सहन झाला नाही अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. सायंकाळी त्यांच्यावर चांदपोल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 15 जून रोजी केदारनाथमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला होता, त्यामध्ये जयपूरच्या शास्त्रीनगरचे रहिवासी पायलट राजवीर सिंहही होते.

राजवीर आर्मीमधून लेफ्टिनंट कर्नल पदावरून निवृत्त झाले होते, तर त्यांची पत्नी दीपिका चौहान सध्या लेफ्टिनंट कर्नल पदावर कार्यरत आहेत. मुलाच्या अंत्ययात्रेवेळी विजयलक्ष्मी यांनी “राजवीर अमर रहे” अशा घोषणाही दिल्या होत्या. आणि भावूक होऊन मुलाच्या फोटोला स्पर्श केला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;