मराठी माणसाच्या एकीपुढे सक्ती हरली, आता आपली एकी कायम ठेवा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मराठी माणसाच्या एकीपुढे सक्ती हरली, आता आपली एकी कायम ठेवा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

हिंदी सक्तीविरोधात मराठी माणसाने एकी दाखवली, मराठी माणसाच्या शक्तीपुढे या सक्तीचा पराभव झाला आहे. त्यामुळे आपण हे संकट परतावून लावले आहे. मात्र, आता यापुढे संकट येण्याची वाट न बघता, संकट येण्याआधीच आपण एकी कायम ठेवू आणि प्रत्येक संकटे परतावून लावू, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेणे, हा मराठी माणसाचा विजय असल्याचे ते म्हणाले.

मराठी माणसापुढे सरकारची सक्ती हरली आहे. मराठी माणूस एकवटला तर मराठी माणसाची शक्ती सरकारच्या शक्तीला हरवते, हे दिसून आले आहे. अशीच चळवळ संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी झाली होती. त्यावेळी जातीभेद मतभेद विसरून सर्व मराठी माणूस एकत्र आला होता. त्यावेळीही मराठी माणसाचा विजय झाला आणि आजही मराठी माणसाचा विजय झाला आहे. मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचा, मराठी माणसांची विभागणी करण्याचा आणि मराठी-अमराठी वाद करत अमराठी मतं भआजपकडे खेचण्याचा त्यांचा डाव होता, या गोष्टीचे वाईट वाटते, असे त्यांनी सांगितले.

मराठी माणसात फूट पाडण्याचा त्यांचा डाव मराठी माणसाच्या संमजसपणामुळे फसला आहे. आमचा भाषेला विरोध नाही. मात्र, भाषेच्या सक्तीला विरोध आहे, अशी सामंजस्याची भूमिका मराठी माणसांनी घेतली. त्यामुळे राज्यात राहाणाऱ्या अमराठी माणसांनाही समजले की, ही लढाई आपल्या भाषेविरुद्ध नसून इथल्या मातृभाषेवर लादण्यात येणाऱ्या सक्तीविरोधात आहे. त्यामुळे फूट पडली नाही आणि सरकारचा डाव फसला. मराठी माणसात फूट पाडून त्याचा त्यांना फायदा घ्यायचा होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

आज झालेल्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठी माणूस एकत्र येईल, असे त्यांना वाटले नव्हते. मात्र. एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठी माणूस एकत्र आल्याने यापुढे ते एकत्र येऊ नयेत, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 5 जुलैला मोर्चाच्या निमित्ताने मराठी माणूस एकत्र येणार होता. ता एकी होऊ नये, यासाठी हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. आता जीआर रद्द केला तर हा जीआर कोणी काढला होता. आता भाजप म्हणजे खोट्यांची अफवांची फॅक्टरी झाली आहे. अफवा पसरवायच्या, खोटेनाटे कथानक रचायचे, विरोधकांची बदनामी करायची आणि खोट्या मार्गाने विजय मिळवणे हा भाजपचा धंदा झाला आहे. त्या धंद्याला मराठी माणसाने चोख प्रत्युत्तर दिले आहे, असे ते म्हणाले.

एखादे संकट येईपर्यंत आपण एक होण्याची वाट का बघायची, मराठी माणसाने कायम एकत्र राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आता एक संकट उंबरठ्यावर आले होते. आपण एकत्र येताच ते संकट माघारी गेले आहे. त्यामुळे जी एकी आली आहे, आपल्याला जाग आली आहे, ती एकी कायम ठेवावी लागेल. आता 5 जुलैला निघणार मोर्चा हा निजयी मोर्चा किंवा सभा अशा स्वरुपाच होईल. आता 5 तारखेला पुन्हा सगळ्यांनी एकत्र यावे, असे त्यांनी म्हटले आहे. आता सरकारने नेमलेल्या समितीला फारसा अर्थ नाही. आता कोणाचीही समिती नेमली तरी ते सक्ती करू शकत नाही, हे त्यांना समजले आहे. आता कोणाचीही समिती नेमली तरी महाराष्ट्रात भाषेची सक्ती होऊ देणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.

मुख्यमंत्र्यांना मराठी समजते की, असा प्रश्न असल्याने आम्ही मराठी सक्तीची मागणी करत आहोत. जीआरबाबतही ते अफवा आणि खोट्या बातम्या पसरवत आहे. आता भाजपने अफवांची फॅक्टरी असा चित्रपट काढावा आणि त्यावर फडणवीसांचा फोटो लावावा. हा जीआर आपण काढला होता, असे ते म्हणतात ,त रतीन वर्षे ते गप्प का होते, तसेच माझ्या जीआरची होळी मीच का करीन,याचा विचार करावा. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावे आणि अफवा, खोटे पसरवण्याचे थांबवावे, असे ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कॉफी तयार करताना झुरळे देखील कुस्करली जातात? FDA ने सांगितलेलं सत्य जाणून घेतल्यास धक्का बसेल कॉफी तयार करताना झुरळे देखील कुस्करली जातात? FDA ने सांगितलेलं सत्य जाणून घेतल्यास धक्का बसेल
चहाप्रमाणेच, कॉफीचेही भारतात अनेक चाहते आहेत. कॉफीशिवाय लोकांची सकाळ अपूर्ण असते, म्हणून आरोग्य तज्ज्ञ देखील कॉफीच्या अनेक फायद्यांबद्दल सांगत असतात....
तुम्ही पण बाळाच्या पायात काळा धागा बांधता? थांबा चूक करताय, बाळाला होऊ शकतो हा धोका
शेअर बाजारातील घसरण थांबणार कधी? अनिश्चततेने गुंतवणूकदार धास्तावले
Skin Care – ‘या’ डाळीच्या वापराने चेहऱ्यावरील मुरूम होतील चटकन दूर, वाचा
‘लाडकी बहीण’साठी आता हॉटेल मालकांच्या पैशांवर डल्ला; ठाणे हॉटेल असोसिएशनकडून हॉटेल बंद
Health Tips – साबुदाणा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का? वाचा
समृद्धी टोल नाक्यावर लुटीची धक्कादायक घटना उघड; अजित पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीसांच्या मुलाला लुटले, 82 हजारांची रोकड लांबवली