Accident news – अंबाजोगाईत दुचाकी अपघातात तिघे ठार, एक गंभीर

Accident news – अंबाजोगाईत दुचाकी अपघातात तिघे ठार, एक गंभीर

अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर-हातोला रस्त्यावर लिमगाव पाटीजवळ शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हातोला येथील अभय सतीश चव्हाण (वय – 25) आणि ऋषिकेश अशोक चव्हाण (वय – 18) हे दुचाकीवरून बर्दापूरहून हातोलाकडे जात असताना लिमगाव पाटीजवळ दोन दुचाकींची धडक झाली. या भीषण अपघातात अभय चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर ऋषिकेश चव्हाण गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, समोरून येणाऱ्या दुचाकीवरील दोघेही तरुण या अपघातात जागीच ठार झाले आहेत. त्यांची नावे अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नसली, तरी ते पानगाव येथील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमीला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;