Asia Cup 2025 – कधी येणार वेळापत्रक, हिंदुस्थान-पाकिस्तान भिडणार का नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Asia Cup 2025 – कधी येणार वेळापत्रक, हिंदुस्थान-पाकिस्तान भिडणार का नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Asia Cup 2025 संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 10 सप्टेंबरपासून आशिया चषकाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. तसेच आशिय चषक हिंदुस्थानसह युएईमध्ये हायब्रीड मॉडेलवर खेळवला जाईल, अशी सुद्धा एक बातमी समोर आली होती. कारण पाकिस्तान हिंदुस्थानात खेळण्यासाठी येणार नाही. या सर्व पार्श्वभुमींचा विचार करता आशियाई क्रिकेट परिषद (ACC) जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, आशियाई क्रिकेट परिषद (ACC) आशिया चषकाच वेळापत्रक जुलैच्या पहिल्या आठवड्याच जाहीर करू शकते. हिंदुस्थान-पाकिस्तानातील तणावपूर्ण वातावरणामुळे टीम इंडिया आणि युएई या दोन देशांमध्ये संयुक्तरित्या आशिया चषक खेळला जाईल अशी शक्यता आहे. आशिया चषक टी-20 फॉरमॅटमध्ये खेळला जाणार आहे. या स्पर्धेत हिंदुस्थान, श्रीलंका, यूएई, अफगानिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान हे सहा देश एकमेकांना भिडणार आहेत. परंतु टीम इंडिया आशिय चषकात खेळणार का नाही याबद्दल अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. BCCI सध्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती समोर आली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच पुढील काही दिवसांमध्ये सर्व चित्र स्पष्ट होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;