परतूरला बबन लोणीकरांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’

परतूरला बबन लोणीकरांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’

‘तुमच्या अंगावर जे कपडे आहेत ते आम्ही दिले, तुमच्या हातात जे डबडे (मोबाईल) आहे ते मोदींमुळे आहे. तसेच तुझ्या बापाला वर्षाला जे सहा हजार येतात ते मोदीमुळे येतात…’ असे शेतकरी व सर्वसामान्यांबाबत भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहबे ठाकरे) जिल्हाप्रमुख महेश नळगे यांच्या नेतृत्वामध्ये शनिवार, 28 जून रोजी महादेव मंदिर चौक येथे बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.

गरीब शेतकरी, कष्टकरी मजुरांना तुम्ही गुलाम समजून थट्टा करू नका, नसता शिवसेनेशी गाठ आहे, असा इशारा जिल्हाप्रमुख महेश नळगे यांनी दिला. यावेळी उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम, तालुकाप्रमुख प्रदीप बोराडे, तालुकाप्रमुख भारतराव पंडित, शहरप्रमुख दत्ता सुरुंग, तालुकाप्रमुख मधुकर पाईकराव, युवासेनेचे तालुका समन्वयक राहुल कदम, संदीप गायकवाड, मार्केट कमिटीचे संचालक विजय वाणी, सरपंच दीपक काळे, विठ्ठल वटाणे, आबासाहेब कदम, दिलीपराव निकम, गोपाळ माने, माऊली राजबिंडे, छगनराव टेकाळे, इब्राहिम कायमखानी, गोविंद मुंदडा, गजानन वटाणे, गजानन मस्के, संदीप मस्के, गणपतराव खोसे, बळीराम सोळंके, अनिल खरात, तुकाराम बोरकर, राजू वाणी यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;