इटलीच्या फॅशन शोमधील ‘ती’ चप्पल कोल्हापुरीच! प्राडा कंपनीने दिली कबुली

इटलीच्या फॅशन शोमधील ‘ती’ चप्पल कोल्हापुरीच! प्राडा कंपनीने दिली कबुली

नुकत्याच इटली येथे झालेल्या एका फॅशन शोमध्ये ‘प्राडा’ कंपनीने कोल्हापुरी चपलेची हुबेहूब नक्कल करून स्वतःच्या ब्रॅण्डच्या नावासह बाजारात आणली. याची किंमतही लाखाच्या घरात केली गेली. तसेच ही चप्पल इटालियन असल्याचे भासविले गेले. सोशल मीडियावर कोल्हापूरकरांकडून यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. काही लोकप्रतिनिधींसह ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रीकल्चर’ने तातडीने इटली येथील ‘प्राडा’चे संचालक पेट्रिझो बर्टेली यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत ही कोल्हापुरी चप्पल असल्याचे ‘प्राडा’कडून जाहीर केल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

इटली येथे झालेल्या ‘प्राडा’ कंपनीच्या फॅशन शोमध्ये पुरुष मॉडेल्सनी कोल्हापुरी चप्पल परिधान केले होते. मात्र, या चप्पलचा उल्लेख कोल्हापुरी चप्पल असा न करता ‘इटालियन लेदर फुटवेअर डिझाइन’ असा केला होता. तसेच ‘प्राडा’ कंपनीचा टॅग लावून एक लाख रुपयांच्या घरात ही चप्पल विकण्याचा घाट घातला होता. याबाबत गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया सुरू होती.

प्राडा कोल्हापुरीसारखी चप्पल एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकत आहे, तर भारतीय कारागीर तीच चप्पल 400 रुपयांत बनवितात.यासंदर्भात कोल्हापुरातील कारागिरांत नाराजी होती.राज्यातील काही कारागिरांनी याप्रकरणी महाराष्ट्र चेंबर
ऑफ कॉमर्सने लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार महाराष्ट्र चेंबरने कारागिरांचा आवाज जागतिक व्यासपीठावर पोहोचविला. चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्राडा ग्रुप कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रमुख लोरेन्झो बर्टेली यांच्याशी पत्रव्यवहार करून वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर इटालियन फॅशन ब्रॅण्ड ‘प्राडा’ने त्यांच्या शोमध्ये सादर केलेली चप्पल ही कोल्हापुरी चप्पल असल्याचे अखेर मान्य केले. प्राडाने उत्तरात म्हटले की, भारतीय पारंपरिक हस्तकलेचे महत्त्व आम्हाला उमगले असून, जबाबदारीने डिझाइन पद्धती, सांस्कृतिक सहभाग आणि स्थानिक कारागिरांशी थेट संवाद साधण्याची आमची तयारी आहे. भारतीय वारशाला प्रामाणिक सन्मान देण्याचा निर्धारही कंपनीकडून व्यक्त करण्यात आल्याचे ललित गांधी यांनी सांगितले.

आतातरी पेटंटसाठी धडपड होणार का?

वैशिष्टय़पूर्ण रचनेमुळे सन 2019 साली केंद्र सरकारच्या पेटंट, डिझाइन आणि ट्रेडमार्क महानियंत्रक कार्यालयाने या चपलांना भौगोलिक निर्देशांक ‘जीआय’ टॅग दिला होता. याचा अर्थ या चपलांची विशिष्टता आणि पारंपरिकता फक्त काही ठराविक भौगोलिक भागांशी संबंधित आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या जिह्यांना ‘जीआय’ मानांकन मिळाले आहे, तर कर्नाटकमधील धारवाड, बेळगाव, बागलकोट, विजयपूर या जिह्यांनाही भौगोलिक मानांकन मिळाले आहे; पण पेटंटसंदर्भात हालचाली अजूनही थंडावल्या आहेत. जोपर्यंत पेटंट मिळत नाही, तोपर्यंत कोल्हापुरी चपलांच्या अशा नकला करून विक्री करण्याचे प्रकार रोखता येणार नाहीत. त्यामुळे यानिमित्ताने पुन्हा एकदा कोल्हापुरी चपलेच्या पेटंटसाठी धडपड होणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एक्सपायर झालेली ही 17 औषधे कचऱ्यात नाही थेट टॉयलेटमध्ये फ्लश करा? अन्यथा आरोग्य येईल धोक्यात एक्सपायर झालेली ही 17 औषधे कचऱ्यात नाही थेट टॉयलेटमध्ये फ्लश करा? अन्यथा आरोग्य येईल धोक्यात
अनेकदा आपण आणलेली औषधे आजार बरा झाल्यानंतर वापरली जात नाहीत आणि वर्षानुवर्षे घरातच पडून राहतात. सहसा अशी औषधे कचऱ्याच्या डब्यात...
रिकाम्या पोटी कोमट पाणी का प्यावे? या समस्या होतील दूर
Photo – प्रियाचं मनमोहक सौंदर्य; अनारकली ड्रेसमध्ये दिसतेय कहर!
IND Vs ENG 3rd Test – लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर घडला दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या एका क्लिकवर
Jammu Kashmir – अमरनाथ यात्रेदरम्यान अनेक बस एकमेकांना धडकल्या, 10 भाविक जखमी
मध्य प्रदेशात 10 फूट उंच पुलावरून कार कोसळली, दोन जणांचा जागीच मृत्यू
Mumbai News – जुन्या वादातून भावांनीच भावाचा काटा काढला, वडाळ्यात तरुणाची निर्घृण हत्या