नोटांनी भरलेली बॅग आणि हातात सिगारेट, शहा सेनेच्या संजय शिरसाट यांच्या व्हिडीओने खळबळ

नोटांनी भरलेली बॅग आणि हातात सिगारेट, शहा सेनेच्या संजय शिरसाट यांच्या व्हिडीओने खळबळ

विटस् हॉटेल खरेदी प्रकरणात अडचणीत सापडलेले शहा सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. त्यापाठोपाठ शिरसाट यांचा नोटांनी भरलेली बॅग आणि हातात सिगारेट धरत फोनवर बोलतानाचा बेडरूममधील एक व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज हा व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला. त्यानंतर हा माझाच बेडरूम असल्याचे शिरसाट यांनी मान्य केले. मात्र त्या बॅगमध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत, असे स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिले.

शिरसाट यांच्या मालमत्तेत मागील पाच वर्षांत 12 पट वाढ झाल्याबाबत आयकर विभागाने त्यांना नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितले आहेत. त्यातच समोर आलेल्या या व्हिडीओमुळे शिरसाट गोत्यात आले आहेत.

हिंमत असेल तर ती रूम माध्यमांना दाखवा – अंजली दमानिया

बॅगमध्ये चक्क पैसे दिसत असताना, ते पैसे नाही, कपडे असतील असे शिरसाट म्हणूच कसे शकतात? हा माझ्या घरच्या व्हिडीओ आहे, असे स्वतःच म्हणत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल आणि ते खरं बोलत असतील तर आजच त्यांनी माध्यमांना घरी नेऊन व्हिडीओमध्ये दिसणारी रूम दाखवावी, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;