प्राथमिक तपासणी करून मतदान यंत्रे तयार ठेवा, राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश
महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण करा. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करून ती मतदानासाठी तयार ठेवा, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत.
राज्यातील 29 पालिकांतील निवडणुकीच्या प्राथमिक तयारीचा आढाव्यासाठी निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज व्हिडीओ का@न्फरन्सद्वारे बैठक घेतली. यावेळी विभागीय आयुक्त आणि पालिका आयुक्त यांच्यासह आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. निवडणुकांच्या तयारीबाबत आतापासूनच दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टळू शकेल, असेही राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List