कथा एका चवीची- नाचो नाचो!

कथा एका चवीची- नाचो नाचो!

>> रश्मी वारंग

तंत्रज्ञानामुळे घडलेली सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे जग जवळ आलं आहे. परक्या देशातील परक्या संस्कृतीतील अनेक गोष्टी आपण इतक्या सहज पाहतो, अनुभवतो आणि वापरतो की, त्या आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होऊन जातात. पदार्थांच्या बाबतीत तर हे विशेष जाणवतं. परक्या देशातून भारतात येऊन इथलाच झालेल्या पदार्थांमधला एक  म्हणजे नाचोज. त्याचीच ही कुरकुरीत गोष्ट.

मेक्सिकोमधील पिएद्रास निग्रास या शहरात नाचोजचा जन्म झाला. त्यामागे एक कहाणी दडलेली आहे. इग्नासिओ अनाया यांनी 1943 साली  ‘व्हिक्टरी क्लब’ या त्यांच्या हॉटेलमध्ये या पदार्थाचा शोध लावला. अमेरिकेतील टेक्सास प्रांत आणि मेक्सिकोतील पिएद्रास निग्रास यांच्यात काही तासांचं अंतर आहे. दोन्ही प्रांतांतली माणसं इकडून तिकडे जात येत असतात. मामी फिनान आणि अमेरिकन लष्करी अधिकाऱयांच्या पत्नींचा एक गट, ज्यांचे पती जवळच्या अमेरिकन लष्करी तळावर फोर्ट डंकन इथे तैनात होते, ते व्हिक्टरी क्लबमध्ये जेवण्यासाठी सीमेपलीकडे गेले. अनाया यांच्या हॉटेलमधील कुक नेमके त्या वेळेला उपलब्ध नसल्यामुळे स्वयंपाकघरात डोकावल्यावर अनाया यांना नुकतेच तळलेले मक्याचे टॉर्टियाज दिसले. हे
टॉर्टियाज अनेक मेक्सिकन पदार्थांमध्ये वरचं आवरण म्हणून वापरले जातात. अनाया यांनी हे टॉर्टियाज त्रिकोणी आकारांमध्ये कापले. वरून किसलेलं चीज आणि इतर काही गोष्टी पसरवल्या आणि या मंडळींना दिलं. त्याची चव विलक्षण आवडलेल्या या मंडळींनी अनायांना विचारलं, “या पदार्थाचं नाव काय?’’ अनाया म्हणाले, “तुम्ही याला ‘नाचोज स्पेशल’’ म्हणू शकता. अनाया यांचं पूर्ण नाव इग्नासिओ अनाया. मेक्सिकोत ‘इग्नासिओ’ या नावाचं टोपणनाव ‘नाचोज’ म्हणून प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे आयत्या वेळेला पाहुण्यांना उपलब्ध पदार्थांतून नवाकोरा पदार्थ देणाऱया इग्नासिओ अनाया यांच्या ‘नाचो’ या टोपणनावातून जन्माला आलेत नाचोज.

पुढे अनाया यांनी याच नावाचे रेस्टॉरंट त्याच शहरात उघडलं. लवकरच ही पाककृती मेक्सिको टेक्सासमधून अमेरिकेतल्या वेगवेगळ्या शहरांत आणि नंतर जगभरात पसरली.1949 मध्ये ‘टेस्ट ऑफ टेक्सास’ या पुस्तकात पहिल्यांदा नाचोज या पदार्थाचा आणि पाककृतीचा उल्लेख झाला. बघता बघता खेळाच्या मैदानात, चित्रपटगृहांमधल्या पॉपकॉर्नला नाचोजने तगडी टक्कर द्यायला सुरुवात केली.

आज भारतात वेगवेगळ्या कॅफेंमध्ये किंवा हवाबंद पाकिटांमधून नाचोज उपलब्ध होताना दिसतात. त्यामुळे स्नॅकसदृश पदार्थ किंवा वेफरला पर्याय या दोन्ही बाजूंनी नाचोज लोकप्रिय होताना दिसत आहेत.

प्रत्येक पदार्थाची आपली एक चव असते. तो प्रांत, तो देश आणि तिथली संस्कृती यांचं ती चव प्रतिनिधित्व करत असते. मेक्सिकन संस्कृतीतून व्हाया अमेरिका भारतात पोहोचलेला हा पदार्थ हळूहळू ती चव भारतीयांच्या जिभेवर रुळवू पाहत आहे. विविध स्वादांमध्ये उपलब्ध हे नाचोज जिभेवर रेंगाळताना आपल्या चवीने थिरकायला लावतात आणि आपणही म्हणू लागतो…नाचो नाचो…!

(लेखिका आरजे व स्तंभलेखिका आहेत.)

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ लोकांसाठी ऊसाचा रस म्हणजे विषच, पिण्याआधी दहावेळा विचार करा ‘या’ लोकांसाठी ऊसाचा रस म्हणजे विषच, पिण्याआधी दहावेळा विचार करा
उसाचा रस हा आपल्या आरोग्यासाठी किती चांगला असतो. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. उन्हाळ्यात तर आवर्जून लोकं कोल्ड्रींक्सपेक्षा उसाच्या रसाला...
आधी मसाला स्प्रे मारला मग चाकूने केले वार, त्यानंतर…; पतीकडून अभिनेत्रीला जीवेमारण्याचा प्रयत्न
बिहारमधील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ; आढळून आले नेपाळ, म्यानमाग, बांगलादेशचे नागरिक
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा, मोठा पडदा गाजवणारे दिग्गज खलनायक कोटा श्रीनिवास राव यांचं निधन
मिंधे गटाच्या ‘त्या’ पाच मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर न्यायालयीन चौकशी लावा, संजय राऊत यांची फडणवीसांकडे मागणी
मराठी बोलणार नाही, मला मारून टाकलं तरी चालेल! प्रसिद्ध अभिनेत्याची मुजोरी
लॉर्ड्सवर शेवटच्या षटकात हायव्हॉल्टेज ड्रामा; शुभमन गिलचा रुद्रावतार, सिराजमधला DSP जागा झाला; नेमकं काय घडलं?