स्टॅमिना वाढविण्यासाठी महागडी प्रोटीन पावडर नको, दररोज फक्त 2 रुपये खर्च करा

स्टॅमिना वाढविण्यासाठी महागडी प्रोटीन पावडर नको, दररोज फक्त 2 रुपये खर्च करा

हिंदुस्थानात सर्वात जास्त सेवन केले जाणारे कोणतेही फळ असेल तर ते केळी आहे. ऋतू कोणताही असो, तुम्हाला केळी सर्वत्र आणि नेहमी आढळतील. काही लोकांसाठी केळी नाश्ता, काही लोकांसाठी दुपारचे जेवण, काही केळी वजन वाढवण्यासाठी तर काही केळी पोटाची समस्या दूर करण्यासाठी खाल्ली जातात.

केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत आणि डॉक्टरही अनेक आजारांमध्ये केळी खाण्याचा सल्ला देतात. केळी हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले फळ आहे यात शंका नाही आणि हे एक सुपरफूड आहे ज्यामध्ये निरोगी व्यक्तीच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले जवळजवळ सर्व गुणधर्म आहेत. सर्वात आधी आपण केळी खाण्याच्या फायद्यांबद्दल बोलू आणि जाणून घेऊया केळी खाण्याचे काय फायदे आहेत.

केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

आपल्या आरोग्यासाठी केळी ही फार गरजेची आहेत. खासकरुन काम करुन थकवा आल्यावर, केळी खाण्यामुळे आपल्यामध्ये उर्जा संचारते.

बहुसंख्य लोक व्यायाम किंवा योगा करण्यापूर्वी केळीचे सेवन करतात जेणेकरून त्यांना चांगला व्यायाम करता येईल आणि लवकर थकवा येऊ नये.

 

शरीरयष्टी खूप बारीक असेल तर, केळे खाणे हे सर्वोत्तम मानले जाते. यामुळे वजन वाढण्यास मदत होते.

केळीमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज असतात ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. यामुळेच तुमचे डॉक्टर आणि फिटनेस ट्रेनर्सही वजन वाढवण्यासाठी केळी खाण्याचा सल्ला देतात.

 

शरीरातील स्टॅमिना वाढवण्यासाठी काय खावे असा प्रश्न ज्यांना पडतो, त्यांना प्रथम केळी खाण्याचा सल्ला दिला जातो.

केळी हा ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे आणि त्यामुळे शरीरातील ऊर्जा आणि तग धरण्याची क्षमता वाढते.

Banana Peels Benefits- केळीची साल केराच्या डब्यात फेकताय, मग जरा थांबा! जाणून घ्या केळीच्या सालीचे उपयोग

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;