परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे पुत्र आणि अजित डोवाल यांच्या संस्थेला चीनचे फंडिंग
हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे पुत्र ध्रुव जयशंकर यांच्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन (ORF) आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी संबंधित विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन (VIF) या संस्थांना चीनकडून निधी मिळाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एस. जयशंकर चीनमध्ये हिंदुस्थानचे राजदूत राहिला आहेत. ध्रुव जयशंकर यांच्याशी निगडित द ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडशेन अमेरिकेच्या पुढाकाराने सुरु आहे. ध्रुव जयशंकर यांची या संस्थेच्या संचालकपदी मागील वर्षी निवड झाली. या संस्थेला चिनी दूतावासाकडून निधी मोठा निधी मिळाला आहे. या संस्थेला चीनच्या दूतावासाकडून 2016 मध्ये 1.25 कोटी तर, 2017 मध्ये 50 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.
अजित डोवाल यांच्याशी संबंधित विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन या संस्थेलाहे चीनकडून मोठा निधी मिळाला आहे. चायना इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज (बीजिंग), चायना इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीज (बीजिंग), सेंटर फॉर साऊथ एशियन स्टडीज (पेंकिंग युनिव्हर्सिटी, बीजिंग), रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर इंडियन ओशन इकॉनॉमीज (युनान युनिव्हर्सिटी ऑफ फायनान्स अँड इकॉनॉमिक्स, कुनमिंग), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्ट्रॅटेजी ऑफ चायनीज अॅकेडमी ऑफ सोशल सायन्सेस (बीजिंग), सेंटर फॉर साऊथ एशिया अँड वेस्ट चायना को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी (चेंगडू), इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशियन स्टडीड (सिचुआन युनिव्हर्सिटी, चेंगडू), सिल्क रोड थिंक टँक नेटवर्क डेव्हलपमेंट रिसर्च कौन्सिल (बीजिंग) आणि सेंटर फॉर इंडियन स्टडीज (शेंझेन), या चिनी संस्थांकडून विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन निधी मिळाल्याचं त्यांनी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केलं आहे.
दरम्यान, विशेषतः हिंदुस्थान-चीन सीमावाद आणि चिनी उत्पादनांवर बहिष्काराच्या चर्चेदरम्यान हा मुद्दा राजकीय वर्तुळात तापला आहे. या प्रकरणावरून सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List