दर्शन रांगेतील घुसखोरी अन् VIP दर्शन रोखल्याने दहा तासांचा अवधी आला पाच तासांवर; भाविक सुखावले
श्री विठ्ठल रखुमाईच्या पदस्पर्श दर्शन रांगेतील घुसखोरी आणि VIP दर्शनाला ब्रेक लावल्याने, दर्शनाला लागणारा दहा तासांचा अवधी पाच तासांवर आला आहे. जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांनी घेतलेल्या सक्त उपाय-योजनांमुळे दर्शन रांगेतील सर्वसामान्य भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. विविध राज्यांमधून निघालेला पालखी सोहळा पंढरीच्या वेशीवर येऊन पोहचला असून अवघी पंढरी नगरी भाविकांनी गजबजून गेली आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांनी पंढरपुरात मोठी गर्दी केली आहे. सकाळ पासूनच दर्शन रांग जवळपास गोपाळपूर जवळ पोहोचली होती. भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर श्री विठ्ठल रूक्मिणीचे व्हिआयपी दर्शनाबाबत आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत तसेच राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आदेश दिले होते. सदर आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का नाही याची पाहणी जिल्हाधिकारी यांनी दर्शन रांग व पत्राशेड येथे केली. तसेच दर्शन रांगेतील भाविकांशी यावेळी संवाद साधला.
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी किमान दहा तासांहून अधिक वेळ लागत होता. तो आता पाच तासांवर आला आहे. दर्शन रांगेत होणारी भाविकांची घुसखोरी आणि शॉर्टकट दर्शनासाठी VIP भाविकांची होणारी गर्दी रोखण्यात जिल्हाधिकाऱ्यांना यश आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शन रांगेतील भाविकांशी थेट संवाद साधून वारीच्या निमित्ताने देण्यात आलेल्या सोयी सुविधा बद्दल चर्चा केली.
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री हे भाविकांना अधिक अधिक दर्शन देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून वारकरी भाविकांसाठी पालखी मार्ग व पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणावर सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या सर्व सुविधांचा आढावा जिल्हाधिकारी आशीर्वाद घेतला. दर्शन रांगेतील भाविकांना नैसर्गिक विधीच्या सोयीसह, पाणी, अल्पोपहार देण्यात येत आहे. रांगेत बसण्याची व्यवस्था, पंखे आदी व्यवस्था करण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List