धनुष्यबाण चिन्हाबाबतची सुनावणी लवकर बोर्डावर घ्या, शिवसेनेच्या मागणीनंतर सर्वोच्च न्यायालयात 16 जुलैला सुनावणी
धनुष्यबाण या आपल्या चिन्हासाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेकडून पुन्हा एकदा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात मेन्शन करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. चिन्हाबाबतची सुनावणी लवकर बोर्डावर घ्या, अशी मागणी आता शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. याबाबत आता येत्या 16 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
धनुष्यबाण चिन्हाबाबत आता 16 जुलैला सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या वकिलांनी स्थानिक निवडणुकांचा हवाला देत चिन्हावर सुनावणीची मागणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील आठवड्यात घोषित होण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद शिवसेनेच्या वकिलांनी केला आहे. मात्र, तातडीच्या सुनावणीला शिंदे गटाकडून विरोध करण्यात आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्याचा मुद्दा शिंदे गटाने उपस्थित केला आहे. यावर न्यायाधिशांनी 16 जुलैला सुनावणी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
17 फ्रेब्रुवारी 2023 ला निवडणूक आयोगानं शिंदे गटाचा चिन्हावरील दावा मान्य केला होता. त्यानंतर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. यावर आता 16 जुलैला सुनावणी होणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List