दलाई लामा यांचा उत्तराधिकारी कोण? चर्चा सुरू; जळफळटाने चीन म्हणाले, आमची परवानगी घ्यावी लागेल!

दलाई लामा यांचा उत्तराधिकारी कोण? चर्चा सुरू; जळफळटाने चीन म्हणाले, आमची परवानगी घ्यावी लागेल!

तिबेटी बौद्ध धार्मिक नेते आणि धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकाऱ्यांबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. आपल्या उत्तराधिकाऱ्याबाबत दलाई लामा यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचा उत्तराधिकारी तिबेटी बौद्ध परंपरेनुसार निवडला जाईल, ज्यामध्ये चीनची कोणतीही भूमिका राहणार नाही. परंतु या विधानामुळे चीन अस्वस्थ आहे. दलाई लामा यांच्या या वक्तव्याने चीनचा जळफळाट झाला असून दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडताना चीनची परवानगी घ्यावी लागेल,त्याशिवाय नवा उत्तराधिकारी निवडला जाणार नाही, असे चीनने म्हटले आहे.

दलाई लामा यांनी उत्तराधिकाऱ्याबाबत केलेल्या वक्तव्याने चीनचा चांगलाच जळफळाट झाला आहे. संतप्त झालेल्या चीनने म्हटले आहे की, उत्तराधिकारी निवडण्यासाठी बीजिंगची परवानगी घ्यावी लागेल. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड चीनच्या शतकानुशतके जुन्या परंपरेनुसार केली जाईल. दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याला चीनच्या नियम आणि धार्मिक रीतिरिवाजांचे पालन करावे लागेल, असेही चीनने म्हटले आहे.

दलाई लामा यांनी त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याची जबाबदारी गदेन फोडरंग ट्रस्टकडे सोपवली आहे. त्यांनी सांगितले की, पुढील दलाई लामा यांची ओळख आणि मान्यता या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी फक्त गादेन फोडरंग ट्रस्टवर असेल. 1959 मध्ये ल्हासा येथे चिनी राजवटीविरुद्ध झालेल्या अयशस्वी बंडानंतर दलाई लामा हिंदुस्थानात आले होते. तेव्हापासून ते हजारो तिबेटी लोकांसह येथे निर्वासित जीवन जगत आहेत. तर चीन त्यांना फुटीरतावादी आणि बंडखोर मानतो, तर दलाई लामा यांना अहिंसा आणि करुणेचे प्रतीक जगात ओळख मिळाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kedarnath Yatra Landslide- केदारनाथ यात्रा पुन्हा थांबली! सोनप्रयागजवळ भूस्खलन, यात्रेकरू सुखरुप Kedarnath Yatra Landslide- केदारनाथ यात्रा पुन्हा थांबली! सोनप्रयागजवळ भूस्खलन, यात्रेकरू सुखरुप
केदारनाथ यात्रेला पुन्हा एकदा हवामानाचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे मुंकटिया स्लाइडिंग झोनमध्ये भूस्खलन झाले असून, यामुळे सोनप्रयागचा रस्ता पूर्णपणे...
Health Tips – उत्तम आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेली 13 जीवनसत्त्वे, वाचा तुम्हाला ही कशातून मिळतील?
Mumbai ऐवजी लिहिले Mumabai, चूक पडली 10 लाख रुपयांना
भाजप म्हणजे ‘डरपोक’ लोकांची ‘डी गँग’, नाशिकमधील पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशावर संजय राऊत यांचा घणाघात
Health Tips – सोयाबीन शरीरासाठी पॉवरहाऊसपेक्षा कमी नाही! वाचा फायदे
शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे हजारो मध्यमवर्गीय मराठी कुटुंबांना दिलासा, नागरी निवारा परिषदेतील वार्षिक मूल्यांकनाची रक्कम होणार कमी; बैठक घेऊन तोडगा काढण्याची महसूलमंत्र्यांची ग्वाही
Cooking Tips – कारल्याची भाजी अशापद्धतीने कराल, तर घरातील सर्वजण आनंदाने खातील, वाचा