विजयी मेळावा दणक्यात होणार; आवाज फक्त मराठीचाच, जय्यत तयारी, शिवसेना-‘मनसे’कडून कामाचा आढावा

विजयी मेळावा दणक्यात होणार; आवाज फक्त मराठीचाच, जय्यत तयारी, शिवसेना-‘मनसे’कडून कामाचा आढावा

शिवसेना-‘मनसे’कडून राज्यातील हिंदी सक्तीविरोधात आंदोलन पुकारताच सरकारने सपशेल माघार घेत हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला. या विजयामुळे मराठी माणसाच्या एकजुटीची प्रचंड वज्रमूठ पुन्हा एकदा दिसून आली. त्यामुळे आता 5 जुलै रोजी वरळीच्या ‘एनएससीआय’ डोममध्ये विजयी जल्लोष साजरा केला जाणार आहे. या मेळाव्याच्या नियोजनाबाबत आज शिवसेना-‘मनसे’च्या पदाधिकाऱयांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.

हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यामुळे शिवसेना-मनसेच्या एकत्रित मोर्चाऐवजी आता वरळीमध्ये मराठीच्या विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सहभागी होणार असल्यामुळे या मेळाव्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘वाजतगाजत या… आम्ही वाट बघतोय…’ असे आवाहनही दोन्ही पक्षांकडून करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी वरळी येथील डोममधील तयारीचा आढावा घेतला. या वेळी शिवसेना आमदार ऍड. अनिल परब, आमदार सुनील शिंदे, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर यांच्यासह ‘मनसे’चे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आदी उपस्थित होते.

ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा

वरळीमध्ये दोन्ही पक्षांकडून मराठी विजयी जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असले तरी मराठी जन आणि इतर पक्षांच्या नेत्यांनीही मराठी जल्लोष सोहळ्याला उपस्थित राहून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाठिंबा देणाऱया सर्वांचे आभार

शिवसेना-‘मनसे’ने हिंदी सक्तीविरोधात जाहीर केलेल्या आंदोलनात अनेक पक्ष, संघटना आणि संस्थांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे या सर्वांचेच आभार दोन्ही पक्षांकडून मानण्यात आले असून विजयी जल्लोष मेळाव्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सिस्टिम शेतकऱ्यांचा जीव घेतेय अन् सरकार श्रीमंतांना कर्जमाफी देतेय! महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येवरून राहुल गांधींचा हल्लाबोल सिस्टिम शेतकऱ्यांचा जीव घेतेय अन् सरकार श्रीमंतांना कर्जमाफी देतेय! महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात अवघ्या 3 महिन्यामध्ये...
‘रामायण’ चित्रपटातील रणबीर कपूरचा ‘रामा’वतार
सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सर निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅनच्या खरेदीत घोटाळा, विजय वडेट्टीवार यांचा आरोप
नरेंद्र जाधवच नाही तर भैयाजी जोशी, दत्तात्रय होसबळे आले तरी समितीचा अहवाल स्वीकारणार नाही! संजय राऊत यांनी ठणकावलं
Delhi Crime – दिल्ली हादरलं! संतापलेल्या नोकराने आई आणि मुलाला जीवानीशी मारलं, कारण वाचून तुम्हीही स्तब्ध व्हाल
वारकऱ्यांना अर्बन नक्षल म्हणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांची घोषणाबाजी
Pune Crime – तोंडावर स्प्रे मारत कुरियर बाॅयने तरुणीवर केला बलात्कार, धमकीही दिली