Pandharpur Wari 2025 – मानाच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यात आगमन, 22 तासांत 1 लाख भाविकांना दर्शनाचा लाभ

Pandharpur Wari 2025 – मानाच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यात आगमन, 22 तासांत 1 लाख भाविकांना दर्शनाचा लाभ

राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेला दिंड्या अन् पालख्यांचा सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर विसावला असून पंढरी नगरी वारकरी भाविकांच्या उपस्थितीमुळे गजबजून गेलीय. चंद्रभागा नदीचे स्नान करुन भाविक श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. देवाची दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत पोहचलीय, एका मिनिटांमध्ये तीस भाविकांना पदस्पर्श दिले जात असल्याने दिवसभरात चाळीस हजार भाविकांना पद दर्शन आणि साठ हजार भाविकांना मुख दर्शन असा एक लाख भाविकांना लाभ मिळतो आहे.
आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपल्याने, पंढरपूर मध्ये वारकऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. मठ, धर्मशाळा, भक्त निवास आणि हॉटेल हाऊसफुल्ल झाली आहेत. शहरातील मोकळी मैदाने, भक्ती सागर, वाळवंट आदी परिसरात भाविकांनी आपल्या मुक्कामाची सोय केलीय. शिवाय शासनाच्या वतीने शहराच्या विविध भागांमध्ये तात्पुरते शेड उभे करुन वारकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांना मूलभूत सेवा सुविधांमध्ये कोणतीही कमतरता भासू नये यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे पंढरीत तळ ठोकून आहेत.
गेल्या महिनाभरापासून वारीचे नियोजन सुरू आहे. स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य, निवारा, कायदा सुव्यवस्था, शौचालये, रस्ते, दर्शन व्यवस्था, स्नान व्यवस्था आदींवर अधिक भर देण्यात आलाय. पालखी सोहळ्यातील गर्दी पाहता यावेळी वारी विक्रमी भरेल असा प्रशासनाचा अंदाज आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्वयंपाकघरातील हा साधा मसाला म्हणेज व्हिटॅमिन बी 12 चा खजिनाच, याच्यापुढे अंडी, चिकनही फेल स्वयंपाकघरातील हा साधा मसाला म्हणेज व्हिटॅमिन बी 12 चा खजिनाच, याच्यापुढे अंडी, चिकनही फेल
भारतीय स्वयंपाक घरात उपलब्ध असलेला जिरा हा एक असा मसाल्याचा पदार्थ आहे, ज्याचा उपयोग हा फक्त पदार्थांची चव वाढवण्यासाठीच नाही...
Bullet Train : आता बिहारमध्ये धावणार बुलेट ट्रेन, मुंबई अहमदाबाद मार्गावर चालणार वंदे भारत ट्रेन
मला हा खटला निकालात काढायचा आहे! न्यायाधीशांनी केलं स्पष्ट, ऑगस्टमध्ये होणार शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर सुनावणी
पहलगाममध्ये झालेला हल्ला हा सुरक्षा व्यवस्थेत झालेली चूक, जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी घेतली जबाबदारी
San Rechal – मिस वर्ल्ड ‘ब्लॅक ब्यूटी’ सॅन रेचेलनं उचललं टोकाचं पाऊल, आर्थिक तंगीमुळं जीवन संपवलं
पावसाळ्यात तोंडली खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
कलेची आणि कलाकारांची किंमत नाही! असे म्हणत अनुराग कश्यप का आणि कुणावर भडकला?