महाराष्ट्रात हिंदी सक्तीविरोधात वणवा पेटला, आदेशाची होळी करून जोरदार निषेध

महाराष्ट्रात हिंदी सक्तीविरोधात वणवा पेटला, आदेशाची होळी करून जोरदार निषेध

पहिलीपासून हिंदी सक्ती लादणाऱ्या सरकारविरोधात शिवसेनेने आज राज्यभरात जोरदार आंदोलन करीत आदेशाची होळी केल्याने हिंदी सक्तीविरोधात अक्षरशः वणवाच पेटला. मुंबईतील प्रत्येक विभाग आणि राज्यातील तालुका-जिल्हा पातळीवर शिवसेनेने आंदोलन केले.

विभाग क्र. 4 : शिवसेना नेते, आमदार ऍड. अनिल परब यांच्या नेतृत्वात हिंदी सक्ती आदेशाची होळी करण्यात आली. यावेळी शिवसेना आमदार वरुण सरदेसाई, आमदार हारून खान, शिवसेना महिला आघाडी, पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सेना कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

विभाग क्र. 1 :  माजी आमदार विलास पोतनीस व विभागप्रमुख उदेश पाटेकर, महिला विभाग संघटक शुभदा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हिंदी सक्तीविरोधात आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी विधानसभा प्रमुख अशोक म्हामूनकर, संजय भोसले, बाळकृष्ण ढमाले, शरयू भोसले, रेखा बोऱहाडे, माजी नगरसेवक योगेश भोईर, विधानसभा निरीक्षक सिनेट सदस्य शशिकांत झोरे, प्रीती दांडेकर, रोशनी गायकवाड, मनोहर खानविलकर, विनायक सामंत, संजय ढोलम, पांडुरंग देसाई, अशोक सोनवणे, उत्तम बारबोले, शाखाप्रमुख दिलीप नागरे व स्नेहा कोटकर आदी उपस्थित होते.

विभाग क्र. 2 : मालाड पश्चिममध्ये आंदोलन करण्यात आले. विभाग समन्वयक अशोक पटेल, विधानसभा प्रमुख कैलास कणसे, विभागप्रमुख संतोष राणे, मनाली चौकीदार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या आंदोलनप्रसंगी  माजी नगरसेविका अनघा म्हात्रे, गीता भंडारी, संगीता सुतार, विधानसभा प्रमुख मीना करांदे, विधानसभा संघटक राजू खान, संतोष धनावडे, गणेश गुरव, विकास दशपुते, राजन निकम, सत्यवान वाणी, दीपक मोरे, अनंत नागम, संदीप कोळी, अंकीत सुतार, प्रशांत कोकणे, श्याम मोरे, रमाकांत ठाकूर, सुषमा कदम, शुभांगी शिंदे, कृष्णा मुळीक आदी उपस्थित होते.

शिवसेना विभाग क्र. 10 : शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई आणि विभागप्रमुख, आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली, प्रबोधनकार ठाकरे चौक येथे हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. यावेळी शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, विभाग संघटिका श्रद्धा जाधव, महिला उपविभाग संघटक माधुरी मांजरेकर, वडाळा विधानसभा संघटक राकेश देशमुख, धारावी विधानसभा संघटक विठ्ठल पवार, विधानसभा प्रमुख वसंत नकाशे, उपविभागप्रमुख जोसेफ कोळी, गंगा देरबेर, शाखाप्रमुख सतीश कटके, किरण काळे, आनंद भोसले, मुत्तू पट्टण तेवर, मनी कंडन, मुन्ना शेख, भास्कर पिल्ले, माहीम विधानसभा उपविभागप्रमुख सिद्धार्थ चव्हाण, अभय तामोरे, सूर्यकांत बिर्जे, शाखाप्रमुख प्रवीण नरे, अजित कदम, मयूर कांबळे, रवीकांत पडायची आदी उपस्थित होते.

जोगेश्वरी : शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांच्या उपस्थितीत रेल्वे स्थानकाजवळ शासन निर्णयाची होळी करण्यात आली. यावेळी आमदार बाळा नर, शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, शीतल देवरुखकर, जोगेश्वरी विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, गोरेगाव विधानसभा समन्वयक दीपक सुर्वे आदी उपस्थित होती.

विभाग क्र. 8 : विभागप्रमुख तुकाराम (सुरेश) पाटील यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ आंदोलन करण्यात आले. या वेळी विभाग संघटिका प्रज्ञा सकपाळ, तिन्ही विधानसभेचे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, युवासेना पदाधिकारी, अंगिकृत संघटना उपस्थित होत्या.  यावेळी महाराष्ट्रद्रोही सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला. शिवसैनिकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

नागपूर : नागपूरमध्ये शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वाखाली रेशीमबाग चौकात आणि संविधान चौकात जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. या वेळी सतीश हरडे, सुरेशजी साखरे, नितीन तिवारी, संदीप पटेल, महेंद्र कटाने, सतीश कुडे, दिलीप तुपकर, किशोर ठाकरे, सुनील बॅनर्जी आदी उपस्थित होते.

नागपूर ग्रामीण : नागपूर ग्रामीण जिल्हाप्रमुख उत्तम कापसे यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली. जोरदार घोषणाबाजी करून सरकारच्या हिंदी सक्ती आदेशाची होळी या वेळी करण्यात आली. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

नाशिक : नाशिकमध्ये आज जोरदार आंदोलन करण्यात आले. या वेळी हिंदी सक्ती आदेशाची होळी करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

विभाग क्र. 9 : विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर रेल्वे स्टेशन येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर, विभाग संघटिका पद्मावती शिंदे, माजी आमदार प्रकाश फातर्पेकर, माजी नगरसेवक अनिल पाटणकर, रामदास कांबळे, विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार, निमिष भोसले आदी उपस्थित होते.

ठाणे : जांभळी नाक्यावर शिवसेना नेते, माजी खासदार राजन किचारे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या जीआरची होळी करण्यात आली. यावेळी ओकळा – माजिवडा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा खोपकर, ऍड. आकांक्षा राणे, प्रवक्ते अनिश गाढवे, मनसेचे शहर अध्यक्ष रकींद्र मोरे, पुष्कराज किचारे, राष्ट्रवादीचे सुहास देसाई, रचना वैद्य आदी उपस्थित होते.

भिवंडी : भिवंडीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. मनोज गगे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या आंदोलनप्रसंगी मोठ्या संख्येने शिवसैनिक-पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग क्र. 6 : विभागप्रमुख सोमनाथ सांगळे यांच्या नेतृत्वाखाली कुर्ला पश्चिमेकडील तानाजी चौकात हिंदीसक्ती विरोधात आंदोलन झाले. यात विभाग संघटिका मनीषा नलावडे, तिन्ही विधानसभांचे विधानसभा प्रमुख, विधानसभा पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक सहभागी झाले.

सोलापूर : सोलापूरमध्ये शिवसेनेच्या वतीने हिंदी सक्तीविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख डॉ. प्रा. अजय दासरी, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, संभाजी शिंदे, धनंजय डिकोळे, संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

चंद्रपूर : शिवसेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेना, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कॉफी तयार करताना झुरळे देखील कुस्करली जातात? FDA ने सांगितलेलं सत्य जाणून घेतल्यास धक्का बसेल कॉफी तयार करताना झुरळे देखील कुस्करली जातात? FDA ने सांगितलेलं सत्य जाणून घेतल्यास धक्का बसेल
चहाप्रमाणेच, कॉफीचेही भारतात अनेक चाहते आहेत. कॉफीशिवाय लोकांची सकाळ अपूर्ण असते, म्हणून आरोग्य तज्ज्ञ देखील कॉफीच्या अनेक फायद्यांबद्दल सांगत असतात....
तुम्ही पण बाळाच्या पायात काळा धागा बांधता? थांबा चूक करताय, बाळाला होऊ शकतो हा धोका
शेअर बाजारातील घसरण थांबणार कधी? अनिश्चततेने गुंतवणूकदार धास्तावले
Skin Care – ‘या’ डाळीच्या वापराने चेहऱ्यावरील मुरूम होतील चटकन दूर, वाचा
‘लाडकी बहीण’साठी आता हॉटेल मालकांच्या पैशांवर डल्ला; ठाणे हॉटेल असोसिएशनकडून हॉटेल बंद
Health Tips – साबुदाणा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का? वाचा
समृद्धी टोल नाक्यावर लुटीची धक्कादायक घटना उघड; अजित पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीसांच्या मुलाला लुटले, 82 हजारांची रोकड लांबवली