पेजयल योजनेच्या खड्ड्यात खोदकाम करताना मातीचा ढिगारा कोसळला, चौघांचा मृत्यू; 11 जण जखमी

पेजयल योजनेच्या खड्ड्यात खोदकाम करताना मातीचा ढिगारा कोसळला, चौघांचा मृत्यू; 11 जण जखमी

पेजयल प्रकल्पासाठी खणलेल्या खड्ड्यात खोदकाम करताना अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्याने 15 जण दबले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने सर्वांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत चौघांचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील जंगी का नागला या गावात रविवारी सकाळी दुर्घटना घडली. या गावात चंबळ पेयजल प्रकल्पाचे खोदकाम सुरू आहे. रविवारी सकाळी गावकरी या खड्ड्यात माती खोदत होते तेव्हा त्यांच्या अंगावर मातीचा ढिगारा पडला. यात 15 जण गाडले गेले.

बचाव पथकाने सर्वांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. यापैकी चौघांचा मृत्यू झाला असून अन्य 11 जण जखमी आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;