दोघांना तिघे घाबरले! नेटकऱ्यांनी महायुतीला धू-धू धुतले, हिंदी सक्तीवरून सरकारच्या माघारीनंतर मीम्सचा पूर

दोघांना तिघे घाबरले! नेटकऱ्यांनी महायुतीला धू-धू धुतले, हिंदी सक्तीवरून सरकारच्या माघारीनंतर मीम्सचा पूर

हिंदी सक्तीविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेली मोर्चाची हाक व त्यास मराठी जनतेने दिलेला पाठिंबा पाहून धास्तावलेल्या महायुती सरकारने आज सपशेल माघार घेतली. हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द करण्यात आले. या सगळ्या घडामोडीचे पडसाद सोशल मीडियात उमटले असून मजेशीर मीम्सचा पूर आला आहे. ‘दोघांना तिघे घाबरले’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी फडणवीस, शिंदे व अजित पवारांची खिल्ली उडवली आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली राज्यात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा डाव महायुती सरकारने आखला होता. हा डाव ओळखून उद्धव ठाकरे यांनी त्यास कडाडून विरोध केला. राज ठाकरे यांनी तीच भूमिका घेतली व दोन्ही बंधूंनी मोर्चाची हाक दिली. मराठीच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचे दिसताच सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले. हा मोर्चा अभूतपूर्व होणार असे दिसताच सरकारने हिंदीसक्तीचा जीआर रद्द केला. त्यामुळे ठाकरे बंधूंची एकजूट जिंकल्याची भावना मराठी जनतेमध्ये आहे. त्याचे प्रतिबिंब सोशल मीडियातील मीम्समध्ये पडले आहे. ठाकरे बंधूंचं कौतुक करतानाच महायुती सरकारची खिल्ली उडवली जात आहे.

सोशल मीडियात फिरत असलेल्या पोस्ट

  • पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
    आपुल्या घरात हाल सोसते मराठी
    हे असे कितीक ‘खेळ’ पाहते मराठी
    शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
  • ‘‘भाजपची जुनी खोड… खडा टाकून बघायचा आणि विरोध झाला की पाय लावून पळ काढायचा!’’
  • उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र फोटो बघून भक्तांची जळजळ होते, दिवसरात्र दोघांच्या नावाने बांगड्या फोडतात! चोंग्यानू रडारड चालू ठेवा, ठाकरेंनी खोलून ठेवली आहे तुमची आणि तुमच्या पक्षाची!
  • दोन भाऊ एकत्र येण्याचा धाक पाहिला असेल आणि पटला असेल तर आता खरंच एकत्र या. मुंबईला मराठी महापौर द्या. ठाकरे ब्रॅन्डचं अभिनंदन.
  • मराठी भाषेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. आणि बाळासाहेबांच्या विचाराचं कातडं पांघरलेला उंदीर कोणत्या बिळात लपलाय.
  • मराठी भाषेचे मारेकरी म्हणून 3 लोकांची इतिहासात नोंद झाली असती, त्यांना तसे पाप करण्यापासून तुम्ही वाचविले आहे. पण त्यांची वळवळ थांबणार नाहीये. व्यापारी वृत्तीचे लोक आहेत ते. पण मराठी जनता तुमच्या पाठीशी आहे. जय महाराष्ट्र
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;