Crime news – वैजापुरात डोक्यात दगड घालून कीर्तनकार महिलेचा खून

Crime news – वैजापुरात डोक्यात दगड घालून कीर्तनकार महिलेचा खून

वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथे अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून कीर्तनकार महिलेचा निर्घृणपणे खून केला. या घटनेने छत्रपती संभाजीनगर जिल्हा हादरून गेला आहे. संगीता अण्णासाहेब पवार (वय – 45) असे मयत कीर्तनकार महिलेचे नाव आहे.

संगीता पवार यांनी संन्यास स्वीकारलेला होता. अनेक वर्षांपासून त्या धार्मिक कार्यात सक्रिय होत्या. अत्यंत साधे राहणीमान असलेल्या पवार या कीर्तन करीत असत. चौधरी नामक महिलेने 25 वर्षांपूर्वी आश्रम टाकण्यासाठी गंगापूर रस्त्यावरील चिंचडगाव शिवारात गट नंबर 50 मध्ये दीड एकर जमीन दान दिली होती. या जमिनीवर ग्रामस्थांनी मोहटा देवी मंदिरही उभारले होते.

दरम्यान, संगीता पवार यांनी सहा महिन्यांपूर्वी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्यानंतर या जागेवर सद्गुरू नारायणगिरी कन्या आश्रम उभारण्याचे काम हाती घेतले होते. या जागेवरून काही ग्रामस्थांनी त्यांच्याशी अनेकदा वाद घातला. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता.

शुक्रवारी रात्री संगीता पवार मोहटा देवी मंदिरात झोपलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्तींनी दरवाजा तोडून मंदिरात प्रवेश केला आणि संगीता पवार यांच्या डोक्यात दगड घालून क्रूरपणे त्यांची हत्या केली आणि मंदिरातील दोन दानपेट्या चोरून नेल्या. मोहटा देवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी हे सकाळी आश्रमात आले असता त्यांना आश्रमाचे गेट आणि कुलूप तोडलेले दिसले. आत प्रवेश केल्यानंतर त्यांना संगीता पवार रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांनी तातडीने गावकरी आणि वैजापूर व वीरगाव पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट दिली. येथील उपजिल्हा रुग्णालयात पवार यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मोहटादेवी मंदिर परिसरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणी कृष्णा अण्णासाहेब पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे हे करीत आहेत. मयत संगीता पवार यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;