शेळगी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकालाच येईना ७ चा पाडा… निलंगा तालुक्यातील इयत्ता दुसरी वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकाकडून घडली घटना

शेळगी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकालाच येईना ७ चा पाडा… निलंगा तालुक्यातील इयत्ता दुसरी वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकाकडून घडली घटना

एकीकडे महाराष्ट्र राज्यात सध्या इंग्रजी, हिंदी विषयाचा मुद्दा गाजत असताना आता चक्क राज्यातील विद्यार्थ्यांचा मराठी शिक्षणाचा हास होत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. इयत्ता दुसरी वर्गाला शिकविणाऱ्या एका शिक्षकाकडून चक्क 7 चा पाढाच चुकीचा दिल्याचा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे पालक वर्गात खळबळ माजली आहे.

सध्या महाराष्ट्रात, राज्यात मराठी शिक्षणाचे महत्त्व कमी होत चालल्याचे आणि इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाकडे वळत आहे. यातच आता चक्क शासनाने हिंदी विषयाचे धोरण महाराष्ट्र राज्यात राबविण्याचे पाऊल घेतले आहे.

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील ग्रामीण भागातील आदर्श गाव, शेळगी येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने चक्क 7 चा पाढाच चुकीच्या पद्धतीने दिला आहे. रोडे स्वरा या इयत्ता 2 री वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीला दिलेला हा सातचा पाढा वडिलांनी पाहिल्यावर डोक्याला हात मारून घेतला. या पाढ्यामध्ये साती-साती एकोनपन्नास हा आकडाच दिलेला नाही तर सात सखे बेचाळीस होत असताना त्या शिक्षकाने साते सखे पंचेचाळीस असे दिले आहे. हा सात एकोचा पाढा लिहून पाठ करण्यासाठी दिला आहे.

इयत्ता दुसरी वर्गात शिकत असलेल्या या स्वरा रोडेचे वडील हे शेती करून मुलीला जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी पाठवीत आहेत व ते शेतातून घरी येताच आपल्या मुलीचे गृहपाठ तपासत असताना वडिलांच्या या सात एकच्या पाढ्यातील चूक लगेचच लक्षात आली व त्यांनी लगेचच शाळेच्या मुख्याध्यापक पांचाळ सरांना फोन करून ही घटना कळवली. त्यावर स्वतः मुख्याध्यापक हेच शाळेत गैरहजर होते व त्यांनी लगेचच संबंधित शिक्षकांच्या नजरेतून नजर चुकीने हा पाढा चुकीच्या पद्धतीने दिला असल्याचे सांगितले.

असा प्रकार पुढे घडणार नाही, असे आश्वासन दिले. पण पालक शाहुराज रोडे यांच्या मनात ही बाब सतावत आहे आणि असे जर शिक्षक पुन्हा पुन्हा अशा चुकीचे शिक्षण जर विद्यार्थ्यांना मिळत असेल तर खूप भयंकर परिस्थिती निर्माण होणार आहे आणि विद्यार्थ्यांना चुकीचे शिक्षण शिकण्याची वेळ येणार आहे. म्हणून संबंधित घटना ही गंभीर आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने यावर गांभीर्याने विचार करून तत्काळ योग्य ती कारवाई करणे आवश्यक असल्याचे दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;