साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 29 जून 2025 ते शनिवार 5 जुलै 2025

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 29 जून 2025 ते शनिवार 5 जुलै 2025

>> नीलिमा प्रधान

मेष – स्पर्धेत चमकाल

मेषेच्या धनेषात शुक्र-चंद्र-गुरू लाभयोग. क्षुल्लक कारणाने  नाराज न होता कामाच्या प्रगतीकडे लक्ष द्या. कठीण कामे करा. भेट-चर्चा करा. नोकरीत उन्नतीचा नवा मार्ग-लाभ. धंद्यात सुधारणा-वाढ-वसुली-कर्ज मिळवा. कोर्ट केसचा मामला संपवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत आश्चर्यचकित यश-प्रतिष्ठा-लोकप्रियता मिळवाल. स्पर्धेत चमकाल. वैयक्तिक जीवनात सुखद समाचार. शुभ दि. 29, 30

वृषभ – नवीन परिचय भाग्याचे

स्वराशीत शुक्र-सूर्य-चंद्र लाभयोग. प्रत्येक दिवस यश देणारा ठरेल. महत्त्वाचे, किचकट काम संपवा. नवीन परिचय भाग्यकारक, सहायक ठरेल. नोकरीत मनाप्रमाणे बदल करता येईल. आळस नको. प्रसिद्धीचा नवा आलेख तयार करा. धंद्यात नवे काम-वाढ. गुंतवणूक योग्य प्रकारे करता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत वर्चस्व, प्रतिष्ठा-लोकप्रियता-पद. जुना वाद, गैरसमज दूर करून नवा मार्ग तयार करा. शुभ दि. 2, 3

मिथुन – चांगला बदल शक्य

मिथुनेच्या व्ययेषात शुक्र-चंद्र-मंगळ युती. किरकोळ वाद, गैरसमज वाढू देऊ नका. अडचणींवर मात करता येईल. नोकरीत बुध्दिमान म्हणून प्रशंसा. चांगला बदल शक्य. धंद्यात वाढ-लाभ-गोड बोला-फसगत टाळा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत उपयुक्त महत्त्वपूर्ण मुद्दे मांडता येतील. कठीण कामे करून घ्या. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. व्यसन नको. शुभ दि. 30, 4

कर्क – कठोर वक्तव्य नको

कर्केच्या एकादशात शुक्र-बुध-प्लुटो प्रतियुती. कोणताही वादöतणाव न वाढवता मधुर वाणीने सर्वांना आपलेसे करावे लागेल. अहंकार-कठोर वक्तव्य नको. सर्व कामे करताना कायद्याचे उल्लंघन करू नका. नोकरी टिकवा. धंद्यात मोठेपणाने नुकसान. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत वरिष्ठांना दुखवू नका. कुणालाही कमी लेखू नका. सहनशीलता-संयम-तडजोड यावर यश खेचावे लागेल. शुभ दि. 30, 1

सिंह – परदेशात जाण्याची संधी

सिंहेच्या दशमेषात शुक्र-सूर्य-चंद्र लाभयोग. प्रत्येक दिवस यश, आत्मविश्वास-उत्साह देणारा ठरेल. कोणतीही किचकट कामे रेंगाळत ठेवू नका. आळस नको. नोकरीत वरिष्ठ प्रशंसा करतील. परदेशात जाण्याची संधी. धंद्यात मोठे काम-फायदा-वसुली. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत बोलताना काळजी घ्या. तुमची लोकप्रियता-प्रतिष्ठा वाढेल. कला-साहित्यात-क्रीडा क्षेत्रांत मोठे यश. शुभ दि. 3, 4

कन्या – संयमी भूमिका घ्या

कन्येच्या भाग्येषात शुक्र-सूर्य-चंद्र त्रिकोण योग. प्रवासात घाई नको, काळजी घ्या. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची नवीन संधी. नोकरीत चांगला बदल-लाभ-कौतुक. धंद्यात राग ठेवू नका- फायदा कमवा-वसुली करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत वर्चस्व प्रस्थापित करण्यात शक्ती वापरा. सहाय्य-सहकार्य अनेक क्षेत्रांतून मिळेल. प्रतिष्ठा-पद मिळेल. केस मिटवा. खरेदी-विक्रीत लाभ. शुभ दि. 4, 5

तूळ – खाण्याची काळजी घ्या

तुळेच्या अष्टमेषात शुक्र-सूर्य-चंद्र त्रिकोण योग. भावनेच्या गुंत्यात अडकाल तर चूक कराल. खाण्याची काळजी घ्या. नोकरीत बुध्दिमत्ता दिसेल, प्रतिस्पर्धी कारवाया करतील. धंद्यात वाढ-लाभ, पण हिशेब नीट ठेवा. मोह नको. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुद्दे तयार करून वरिष्ठांना दाखवता येतील. सहकारी-मित्र यांना नाराज करू नका. सर्वत्र गुप्त कारवायांवर नजर ठेवा. प्रतिष्ठा वाढेल. शुभ दि. 29, 30

वृश्चिक – चर्चाकरारात घाई नको

वृश्चिकेच्या सप्तमेषात शुक्र-चंद्र-बुध लाभयोग. क्षेत्र कोणतेही असो, चर्चा करताना, करार करताना घाई नको, चूक नको. अहंकार उपयुक्त नाही. नोकरीत वरिष्ठांना कमी लेखू नका. सच्चा मित्र सहाय्य करेल. कौटुंबिक तणाव वाढू देऊ नका. धंद्यात सावध भूमिका घ्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत आरोप, शत्रुत्व, माणसे पारखूनच निर्णय घ्या. तुमचे मुद्दे कमकुवत ठरतील. शुभ दि. 1, 2

धनु – कायद्याला धरूनच बोला

धनुच्या षष्ठेशात शुक्र-सूर्य-चंद्र त्रिकोण योग. क्षेत्र कोणतेही असो, आत्मविश्वासाने पुढे जाता येईल. सहकारी कोण, विरोधक कोण हे समजणे मात्र कठीण वाटेल. फसगत टाळा. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, वर्चस्व वाढेल. धंद्यात मोह-व्यसन नको. लाभ होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत गुप्त कारवाया वाढतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल, कारवाया करणारे समजतील. कायद्याला धरूनच बोला. शुभ दि. 1, 3

मकर – तटस्थ धोरण ठेवा

मकरेच्या पंचमेषात शुक्र-चंद्र-बुध लाभयोग. कठीण समय येता कोण कामास येतो, याचा कटू अनुभव येउढ शकतो. योग्य व्यक्तीचाच सल्ला घ्या. नोकरी टिकवा, चूक होईल. धंद्यात आत्मविश्वासाचा दावा जास्त करू नका. तुम्हाला गोत्यात आणण्याचा प्रयत्न होईल. प्रवासात-दौऱ्यात काळजी घ्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रतिष्ठा पणाला लावू नका. तटस्थ धोरण ठेवा. मैत्रीची भाषा करा. शुभ दि. 2, 3

कुंभ – नुकसान टाळा

पुंभेच्या सुखेषात शुक्र-सूर्य-चंद्र त्रिकोण योग. वादग्रस्त-कठोर बोलणे मनस्ताप वाढवणारे, शत्रुत्व वाढवणारे ठरेल. नोकरीत नकळत होणारी चूक मोठी ठरवली जाईल, वरिष्ठ बाजू घेतील. धंद्यात गोड बोला, नुकसान टाळा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत आपलेच लोक दुरावा दाखवतील. अनेक दिग्गज साहाय्य करतील. बोलताना रागावर, शब्दावर नियंत्रण ठेवा. आजचा शत्रू उद्या मित्र होईल. शुभ दि. 4, 5

मीन – चतुर वक्तव्याची गरज

मीनेच्या पराक्रमात शुक्र-चंद्रöबुध लाभयोग. कठीण प्रसंग, अडचणी येतील. सौम्य-मधुर-चतुर वक्तव्याची गरज आहे. नुकसान टाळता येईल. नोकरीत व्याप-दगदग, कामात चूक होईल. धंद्यात अरेरावी नको. राजकीय – सामाजिक क्षेत्रांत तुमच्या प्रगतीला रोखण्याचा डावपेच टाकून नामोहरम करण्याचा गुप्त खेळ खेळला जाईल. सावध रहा. प्रतिष्ठा जपा. कायदा सर्वत्र पाळा. शुभ दि. 2, 3

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एक्सपायर झालेली ही 17 औषधे कचऱ्यात नाही थेट टॉयलेटमध्ये फ्लश करा? अन्यथा आरोग्य येईल धोक्यात एक्सपायर झालेली ही 17 औषधे कचऱ्यात नाही थेट टॉयलेटमध्ये फ्लश करा? अन्यथा आरोग्य येईल धोक्यात
अनेकदा आपण आणलेली औषधे आजार बरा झाल्यानंतर वापरली जात नाहीत आणि वर्षानुवर्षे घरातच पडून राहतात. सहसा अशी औषधे कचऱ्याच्या डब्यात...
रिकाम्या पोटी कोमट पाणी का प्यावे? या समस्या होतील दूर
Photo – प्रियाचं मनमोहक सौंदर्य; अनारकली ड्रेसमध्ये दिसतेय कहर!
IND Vs ENG 3rd Test – लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर घडला दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या एका क्लिकवर
Jammu Kashmir – अमरनाथ यात्रेदरम्यान अनेक बस एकमेकांना धडकल्या, 10 भाविक जखमी
मध्य प्रदेशात 10 फूट उंच पुलावरून कार कोसळली, दोन जणांचा जागीच मृत्यू
Mumbai News – जुन्या वादातून भावांनीच भावाचा काटा काढला, वडाळ्यात तरुणाची निर्घृण हत्या