उद्योगविश्व -आम्ही दोघी आत्मनिर्भर

उद्योगविश्व -आम्ही दोघी आत्मनिर्भर

>> अश्विन बापट

कोरोनाचा काळ तुम्हा आम्हाला बरंच काही शिकवून गेलाय. याच कोरोना काळाने वेगळा विचार करून उद्योगव्यवसायात वेगळी पावलंही टाकायला लावली. असाच एक विचार केला दोन जावांनी. घरासाठी आपणही काहीतरी हातभार लावावा म्हणून या दोघींनी पापड व्यवसायासह अनारसे पीठ, फराळी पदार्थ बनवायला सुरुवात केली. ही कहाणी आहे पुण्याजवळील कोंढव्यातल्या श्री रुक्मिणी महिला गृह उद्योगाच्या अर्चना कामठे आणि सीमा कामठे या दोन जावांची.

त्यांच्या व्यवसायाबद्दल अर्चना कामठे आणि सीमा कामठे या दोघी जावांना बोलतं केलं तेव्हा त्या म्हणाल्या, “कोरोनानंतर म्हणजे 2021च्याऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास आम्ही व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला पापडासाठी मशीन घेतलं. उडदाचे पापड बनवणं सुरू केलं. मग उपवासाचे पापड, मुगाचे पापड अशी व्हरायटी त्यात अॅड केली. अधिक महिना आला तेव्हा त्यात आम्हाला नवीन उत्पादनाची भर घालावीशी वाटली. मग आम्ही अनारसे पीठ सुरू केलं. सुरुवातीला 60 ते 70 किलो पीठ दिवसाला जाईल एवढी ऑर्डर लगेच मिळाली. मग ठरावीक अंतराने आम्ही आमच्या या पदार्थांच्या यादीत भरच घालत राहिलो. थालीपीठ भाजणी, चकली भाजणी अशी पिठंही आम्ही सुरू केली. दिवाळीच्या दिवसांसाठी तसंच रुखवतासाठीही खास फराळी पदार्थ करणं हेही ठरवलं होतंच. त्याही दृष्टीने चकली, चिवडा, शंकरपाळे, लाडू अशी पॅकेट्स करून विक्रीसाठी ठेवू लागलो. तसंच या पदार्थांची थाळी सजवून आम्ही लग्नाच्या रुखवतासाठी देऊ लागलो. दिवसागणिक व्यवसाय वाढू लागला. आमचं एकत्र कुटुंब असल्याने आमचे पाच-सहा कुटुंबीयदेखील यात हातभार लावू लागले. शिवाय गरजेनुसार आम्ही ऑर्डरसाठी किंवा पॅकिंगसाठी बाहेरून महिला कामगार बोलवून काम करून घेऊ लागलो. याशिवाय व्हॉट्सआप ग्रुपच्या माध्यमातून आमची उत्पादनांची घाऊक विक्री होऊ लागली. आम्ही अशा महिलांना विकू लागलो, ज्यांना ती उत्पादनं विकून चार पैसे कमवता येतील. तसंच त्यांना या उद्योग- व्यवसायापासून प्रेरणा मिळेल.

तांदळाचे पापड, ज्याला आपण खिचिया पापड असंही म्हणतो, तेही आम्ही बनवून विकतो. ज्याला चांगली मागणी आहे. पापड हा आमचा सर्वाधिक मागणी असलेला पदार्थ आहे. सीझनमध्ये म्हणजे जेव्हा अधिक मागणी असते तेव्हा दिवसाला 10 ते 15 किलो पापडही आम्ही तयार करतो.  बाजरीचे खारवडय़ासारखा हटके पदार्थही लोकांना आवडतो. बाजरी भिजवून ती चुलीवर शिजवायची. त्यातून हा खारवडय़ासारखा अर्थात बाजरीच्या चकलीसारखा हा पदार्थ तयार केला जातो. विविध पापडांची व्हरायटीदेखील आम्ही तयार करत असतो. तसंच आमच्या गव्हाच्या कुरडईलाही चांगली मागणी असते. उपवासाच्या पापडांनाही जेव्हा आपले सणवार-उपवास सुरू होतात त्या काळात उपवासाचे पापडही चांगलेच डिमांडमध्ये असतात. आम्हाला हा व्यवसाय आणखी वाढवायचाय, पण घरचं काम, मुलांचं शिक्षण सांभाळून आम्ही हे करत असल्याने आम्ही उत्पादनाचं प्रमाण आमच्या क्षमतेनुसारच ठेवलंय. भविष्यात मात्र चार ते पाच कामगार ठेवून हे उत्पादन आणि विक्री वाढवण्याचा आमचा नक्की प्रयत्न आहे.

(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोडय़ुसर सीनियर न्यूज अँकर आहेत.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ लोकांसाठी ऊसाचा रस म्हणजे विषच, पिण्याआधी दहावेळा विचार करा ‘या’ लोकांसाठी ऊसाचा रस म्हणजे विषच, पिण्याआधी दहावेळा विचार करा
उसाचा रस हा आपल्या आरोग्यासाठी किती चांगला असतो. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. उन्हाळ्यात तर आवर्जून लोकं कोल्ड्रींक्सपेक्षा उसाच्या रसाला...
आधी मसाला स्प्रे मारला मग चाकूने केले वार, त्यानंतर…; पतीकडून अभिनेत्रीला जीवेमारण्याचा प्रयत्न
बिहारमधील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ; आढळून आले नेपाळ, म्यानमाग, बांगलादेशचे नागरिक
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा, मोठा पडदा गाजवणारे दिग्गज खलनायक कोटा श्रीनिवास राव यांचं निधन
मिंधे गटाच्या ‘त्या’ पाच मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर न्यायालयीन चौकशी लावा, संजय राऊत यांची फडणवीसांकडे मागणी
मराठी बोलणार नाही, मला मारून टाकलं तरी चालेल! प्रसिद्ध अभिनेत्याची मुजोरी
लॉर्ड्सवर शेवटच्या षटकात हायव्हॉल्टेज ड्रामा; शुभमन गिलचा रुद्रावतार, सिराजमधला DSP जागा झाला; नेमकं काय घडलं?