खताच्या तुटवडय़ामुळे शेतकरी हवालदील, कर्जमाफीचे काय झाले; अनिल देशमुख यांचा फडणवीस सरकारला सवाल

खताच्या तुटवडय़ामुळे शेतकरी हवालदील, कर्जमाफीचे काय झाले; अनिल देशमुख यांचा फडणवीस सरकारला सवाल

पेरणी हंगाम जवळ येवून सुध्दा आवश्यक असलेली खते बाजारात उपलब्ध नसल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. एकीकडे शेतकरी शेतात राबराब राबुन उत्पादन घेतो. नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसान होते. परंतु, त्याला नुकसान भरपाई मिळत नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्जममाफीच्या आश्वासनाचे काय झाले असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

त्याला मदत मिळत नाही. जो शेतमाल तो बाजारात आणतो त्याला मातीमोल भाव मिळत असल्याने साधा उत्पादन खर्चही निघत नाही. यामुळे त्याच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत जाहीर सभेत सत्ता आल्यास शेतकऩयांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. सत्ता येवून सात महिने झाले परंतु यावर कोणताही निर्णय झाला नाही. आता खरीपाच्या पेरणीसाठी लागणारे खते बाजारात नसल्याने शेतकऩयांसमोर नवीन संकट उभे ठाकले आहे. राज्यात डि.ए.पी. सह युरीया व इतर मिश्रखतांना मोठया प्रमाणात तुटवडा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;