सातारा जिल्ह्यातून 96 विशेष बस धावणार

सातारा जिल्ह्यातून 96 विशेष बस धावणार

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात 26 जून रोजी आगमन होत असून, या पार्श्वभूमीवर वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सज्ज झाले आहे. पालखी सोहळ्याच्या कालावधीत 26 ते 29 जूनदरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध मार्गांवर एकूण 96 विशेष बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील विविध आगारांमधून या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये फलटण आगारातून सर्वाधिक 28 बसेस, तर सातारा येथून 12 वाई आणि दहिवडी प्रत्येकी 10, पारगाव खंडाळा 10 आणि वडूज येथून आठ बसेस वारकऱ्यांच्या सेवेत असतील. याव्यतिरिक्त कराड, कोरेगाव, पाटण, महाबळेश्वर आणि मेढा आगारांतूनही बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सातारा-लोणंद मार्गावर 28 बसेस, तर लोणंद-फलटण-पंढरपूर-शिंगणापूर मार्गावर 24 बसेस असतील.

पालखी मार्गावर कापडगाव फाटा, गोटे माळ, विरोबाबस्ती येथे तात्पुरत्या शेड्सची उभारणी करण्यात आली असून, तेथे वाहतूक निरीक्षक व नियंत्रकांची नियुक्ती केली आहे. पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तरडगाव मुक्कामावेळी तरडगाव-फलटण मार्गावर 10 आणि तरडगाव लोणंद मार्गावर पाच जादा बसेस फलटण मुक्कामावेळी (दि. 28) फलटण-सातारा मार्गावर 30 फलटण-शिंगणापूर-पंढरपूर मार्गावर 20, तर बरड मुक्कामावेळी (दि. 29) फलटण-बरड मार्गावर 10 जादा बसेस सोडण्यात येतील. लोणंद, तरडगाव फलटण, बरड येथे अतिरिक्त अधिवारी व कर्मधारी नियुक्त करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात महामंडळामार्फत जादा एसटी बसेसचे नियोजन केले आहे. वारकरी, भाविकांनी या जादा एसटी बससेवेचा लाभ घ्यावा, असे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;