भेंडीबाजाराचा चेहरामोहरा बदलतोय! सामूहिक पुनर्विकास प्रकल्पात 1200 कुटुंबांना हक्काचे घर, सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टचा आशादायी प्रकल्प

भेंडीबाजाराचा चेहरामोहरा बदलतोय! सामूहिक पुनर्विकास प्रकल्पात 1200 कुटुंबांना हक्काचे घर, सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टचा आशादायी प्रकल्प

सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने सामाजिक जबाबदारी घेत भेंडीबाजारामध्ये देशातील पहिला सामूहिक पुनर्विकास प्रकल्प राबवत पागडी पद्धतीत राहणाऱ्या सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळवून दिले आहे. प्रकल्पाचा दुसरा टप्पा या वर्षाअखेरीला पूर्ण होणार असून त्यात 1200 हून अधिक कुटुंबांना 375 ते 1100 चौरस फुटांची घरे आणि अडीच हजारांहून जास्त व्यावसायिक गाळे दिले जाणार आहेत. धर्मगुरू सईदना मोहम्मद बुऱ्हानुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली 2009 साली सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने पुढाकार घेत रहिवाशांना विश्वास घेत ना नफा ना तोटा तत्त्वावर पर्यावरणपूरक आणि शाश्वत असा सामूहिक पुनर्विकास प्रकल्प राबवण्याचे ठरवले.

53 मजली दोन टॉवर्स, 10 लिफ्ट, पार्ंकग, दुकानांसाठी चार मजले 

सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने 2019 साली पहिल्या टप्प्यात सामूहिक पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून 610 कुटुंबांना घरे आणि 128 व्यावसायिकांना गाळ्यांचा ताबा दिला आहे. या दुसऱ्या टप्प्यात 53 मजल्यांचे दोन टॉवर्स उभारण्यात आले असून त्या माध्यमातून 1200 हून अधिक लोकांना मुबलक जागा असलेले पोडियम, पार्किंग आणि दुकानांसाठी चार-चार मजले, प्रत्येक मजल्यांवर 10 लिफ्ट अशा सर्व सोयीसुविधांनीयुक्त घरे देणार असून 700 झाडे, सौरप्रकल्प आणि रेनवॉटर हार्व्हेस्टिंगचा वापर करण्यात आला आहे. 2021 साली सुरू झालेले हे बांधकाम आता या वर्षाच्या अखेरीला पूर्ण होणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प 16.50 एकरमध्ये राबवला जात असून यात एकूण 3 हजाराहून जास्त कुटुंबांचे पुनर्वसन केले जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;