टोकन दर्शनाचे बोगस पास बनवून रांगेत प्रवेश करणाऱ्या 6 भाविकांवर कारवाई

टोकन दर्शनाचे बोगस पास बनवून रांगेत प्रवेश करणाऱ्या 6 भाविकांवर कारवाई

श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना सुलभ व जलद दर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दि. 15 जून पासून टोकन दर्शन चाचणी सुरु करण्यात आली आहे. यामुळे भाविकांना जलद दर्शन मिळत आहे. त्यामुळे भाविक टोकन दर्शन पास मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, मंगळवार दि. 24 जून रोजी टोकन दर्शनाचे बोगस पास घेऊन टोकन दर्शन रांगेत प्रवेश करणार्‍या हिंगोली जिल्ह्यातील 6 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. बोगस टोकन पास प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कडक कारवाई येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत दर्शन रांगेतील भाविकांचे सुलभ व जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार टोकन दर्शन चाचणी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. टोकन दर्शन प्रणालीचे पासेस मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर बुकींगची सोय आहे. त्यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाविकांमधून टोकन दर्शन पासचे कौतूक केले जात आहे.मात्र, दि. 24 जून रोजी सकाळी 9 वाजता हिंगोली जिल्ह्यातील पार्वतीबाई बापूराव बेले, लक्ष्मीबाई केशवराव बळे, संध्या मारूतीराव सातपुते, अरूणा विठ्ठलराव सातपुते, सुधाकर रामचंद्र भालेराव व केशव गणपतराव हरबळे या व्यक्तींनी टोकन दर्शन प्रणालीचे बोगस पास घेऊन टोकन दर्शन रांगेतील प्रवेशद्वारावर आले. यानंतर नियमानुसार पासची तपासणी करण्यात आली. यात त्यांच्या जवळचे पास बोगस असल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे त्यांना पंढरपूर शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बोगस पास कोणी दिले. पाससाठी पैसे घेतले का? याबाबतचा अधिक तपास पोलीसांकडून सुरु आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांचे जलद व सुलभ दर्शन होण्यासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरु करण्यात आलेली आहे. भाविकांची वाढती मागणी लक्षात घेवून टोकन दर्शन पासची संख्याही वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे भाविकांनी मंदिर समितीच्या संकेत स्थळावरुन पास उपलब्ध करुन घ्यावेत. कोणी पास देण्याचे आमिष दाखवत असतील तर त्याला भाविकांनी बळी पडू नये. -राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी, मंदिर समिती

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अकोला जिह्यातील युवासेना पदाधिकारी जाहीर अकोला जिह्यातील युवासेना पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अकोला जिह्यातील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत....
12 दिवसांच्या लादलेल्या युद्धाचा अंत, इराणच्या राष्ट्रपतींनी केली शस्त्रसंधीची घोषणा
Latur News – एक लाखांच्या वाळूसह तब्बल 1 कोटींहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त; 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल 
IND Vs ENG 1st Test – युवा ब्रिगेडचा जोश कमी पडला! लीड्स कसोटीत इंग्लंडची सरशी, टीम इंडियाचा 5 विकेटने पराभव
आंबा पिकवायचा? ‘या’ उपायांनी केमिकलशिवाय घरीच पिकवा
सेक्स रॅकेट प्रकरण : खेडशीतील गौरव लॉजवर सात दिवसात 86 जणांची हजेरी
चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्यात, आषाढीच्या तोंडावर पुराचे सावट