सरकारी पैशाची उधळपट्टी थांबवा, लोकसभा अध्यक्षांनी टोचले कान

सरकारी पैशाची उधळपट्टी थांबवा, लोकसभा अध्यक्षांनी टोचले कान

संसदीय अंदाज समित्या या ‘मिनी पार्लमेंट’ म्हणून काम करतात. संसदीय समितीच्या माध्यमातून सरकारच्या कारभारात पारदर्शकता आणता येते. सरकारच्या कारभारात वित्तीय पारदर्शकता आणि सरकारी पैशाची उधळपट्टी रोखण्याचे काम आणि प्रत्येक पैशाचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी करा. अंदाज समित्यांच्या कारभारात आर्थिक पारदर्शकता गरजेची आहे, अशा  स्पष्ट शब्दांत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज लोकप्रतिनिधींचे कान टोचले.

z समारोपाच्या भाषणात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अंदाज समित्यांनी अत्यंत पारदर्शकतेने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. सरकारच्या एक एक पैशाचा आणि प्रत्येक रुपयाचा जनतेच्या कल्याणासाठी नियोजित पद्धतीने उपयोग करण्यासाठी समिती चांगल्या प्रकारे काम करील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अंदाज समिती संशयाच्या भोवऱ्यात

धुळ्यातील अंदाज समितीच्या आधी धुळ्याच्या रेस्ट हाऊसमध्ये कोटय़वधी रुपयांची बेहिशेबी रक्कम सापडली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की,  पण आताची अंदाज समिती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे याकडे अंबादास दानवे यांनी लक्ष वेधले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;