प्रसिद्ध तमिळ अभिनेता श्रीकांतला ड्रग्ज प्रकरणात अटक, कोकेन खरेदी तसेच सेवनाचा आरोप

प्रसिद्ध तमिळ अभिनेता श्रीकांतला ड्रग्ज प्रकरणात अटक, कोकेन खरेदी तसेच सेवनाचा आरोप

दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रीकांतला ड्रग्जच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. चेन्नई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्यावर कोकेन खरेदी आणि सेवन केल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे. याच कारणास्तव चेन्नई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, श्रीकांतला आता 7 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांतवर चेन्नईतील एका ड्रग्ज डिलरकडून कोकेन खरेदी आणि सेवन केल्याचा आरोप आहे.

माध्यमांनी या माहितीची खातरजमा केली असून, चेन्नई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने श्रीकांतच्या अटकेचे वृत्तात तथ्य असल्याचे सांगितले आहे. श्रीकांत हा चेन्नईतील तीन ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात होता. पोलिसांचे म्हणणे आहे की तो, ड्रग्ज कार्टेलकडून कोकेन खरेदी करून त्याचे सेवन करायचा. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा रक्ताच्या नमुन्यात त्याने कोकेन सेवन केल्याचे उघड झाले आहे. हे उघड झाल्यानंतरच त्याला अटक करण्यात आली. श्रीकांतला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ७ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे.

चेन्नई पोलिस या ड्रग्जसंदर्भात अधिक माहिती गोळा करत होते. या दरम्यान अण्णा द्रमुकचे माजी अधिकारी टी प्रसाद यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याआधी पोलिसांनी प्रदीप कुमार नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. या व्यक्तीने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीच्या आधारे, जॉन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. या तिघांच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनंतर श्रीकांतचे नाव उघड झाले आणि त्यानंतरच श्रीकांतला अटक करण्यात आली आहे.

श्रीकांतची कारकीर्द

श्रीकांतच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, श्रीकांतने अनेक तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रेक्षकांचा तो लाडका अभिनेता असून, त्याचे नाव या ड्रग्ज प्रकरणात आल्यामुळे चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. असे म्हटले जात आहे की येणारा काळ श्रीकांतसाठी कठीण असेल. २००२ मध्ये श्रीकांतने रोजा कुट्टम या तमिळ चित्रपटातून दक्षिण चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि त्याने ३ इडियट्सच्या तमिळ रिमेकमध्येही आपला अभिनयाची चुणूक त्याने दाखवली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;