Israel Iran Ceasefire : नेतान्याहू आणि ट्रम्प यांची खुमखुमी जिरवून इराणचा ‘युद्धविराम’

Israel Iran Ceasefire : नेतान्याहू आणि ट्रम्प यांची खुमखुमी जिरवून इराणचा ‘युद्धविराम’

‘सुरुवात भलेही तुम्ही केली असेल, पण शेवट आम्ही करणार’ असे म्हणत इस्रायल व अमेरिकेच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देणाऱया अयातुल्लाह खामेनी यांच्या इराणने आपला शब्द खरा करून दाखवला. इराणशी नडणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची युद्धाची खुमखुमी इराणने अक्षरशः जिरवली. तब्बल 11 दिवस इस्रायलशी दोन हात करतानाच इराणमधील अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणाऱया अमेरिकेचे आखातातील हवाई तळही खामेनी यांच्या रेव्होलुशनरी गार्डने उद्ध्वस्त केले. इराणच्या आक्रमक पवित्र्यानंतर अमेरिका व इस्रायलने भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी पहाटे 3 वाजून 32 मिनिटांनी अनपेक्षितपणे शस्त्रसंधीची घोषणा केली. मात्र, त्यानंतरही इस्रायलच्या बेरशबा शहरावर शेवटचा वार करूनच इराणने बाराव्या दिवशी युद्धविराम जाहीर केला.

इराणने मोठा आण्विक कार्यक्रम हाती घेतला असून त्यापासून इस्रायलसह जगाला धोका असल्याची हाकाटी पिटत इस्रायलने 12 जून रोजी इराणवर पहिला हल्ला केला. इस्रायलच्या या हल्ल्याला इराणने प्रत्युत्तर दिले. दिवसागणिक हा संघर्ष वाढत गेला. सुरुवातीला इस्रायलला पडद्याआडून पाठिंबा देणाऱया अमेरिकेने दहाव्या दिवशी युद्धात उडी घेतली व इराणमधील तीन अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला चढवला. या आघातामुळे इराण शरण येईल असा अमेरिका व इस्रायलचा होरा होता. तो साफ चुकला. इराणने इस्रायलसह अमेरिकेच्या आखातातील तळांवरही प्रतिहल्ले सुरू केले. त्याचबरोबर, तेल वाहतुकीचा महत्त्वाचा जलमार्ग बंद करून जगाची आर्थिक कोंडी करण्याची धमकी दिली. इराणच्या या रणनीतीपुढे अखेर इस्रायल व अमेरिकेला नमते घ्यावे लागले आहे.

इराणचा अमेरिकेला चकवा, 400 किलो युरेनियम सुरक्षित

अमेरिकेने इराणमधील फोर्दो, नतान्झ आणि इस्फाहान अणुकेंद्रांवर हल्ले करून ते उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता. मात्र, इराणने अमेरिकेच्या हल्ल्याच्या आधीच तब्बल 400 किलो युरेनियमचा साठा

रातोरात गुप्त जागी हलवला. हा साठा विशिष्ट प्रकारच्या

बॅरल्समध्ये होता. हा साठा इतका आहे की, त्यापासून 9 ते 10 अणुबॉम्ब बनवले जाऊ शकतात अशी खास सूत्रांची माहिती आहे. अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनाही हाच संशय आहे.

इराण-इस्रायलवर ट्रम्प भडकले!

ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतरही इस्रायलने इराणवर हल्ला केला. इराणनेही त्यास प्रत्युत्तर देत इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली. हे कळताच डोनाल्ड ट्रम्प भडकले. ‘इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांवर मी नाराज आहे. ते काय करतायत हे त्यांचे त्यांना कळत नाही, असे सांगताना ट्रम्प यांना संताप अनावर झाला. शेवटचा वार इराणच करणार याची कल्पना असल्याने शेवटी ट्रम्प यांनीच इस्रायलच्या वतीने हल्ला थांबवण्याची घोषणा केली. इस्रायलची सगळी विमाने परत येतील, असे त्यांनी सांगितले.

…तरच आम्ही युद्धबंदी पाळू!

‘दहशतवादी’ तेल अवीवने युद्ध सुरू केले आणि आम्ही ते संपवले, अशी गर्जना इराणने केली. ‘ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेचे आम्ही स्वागत करतो. मात्र, इस्रायलने हल्ले थांबवले तरच आम्ही ही युद्धबंदी पाळू,’ असेही इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी ठणकावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मी पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवत आहे…; पतीने व्हिडिओ बनवत उचललं टोकाचं पाऊल मी पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवत आहे…; पतीने व्हिडिओ बनवत उचललं टोकाचं पाऊल
पत्नीचे अनैतिक संबंध, नवरा बायकोमधील वाद किंवा कुटुंबाचा हस्तक्षेप यांसराख्या कारणांवरून पतीच्या हत्येचे किंवा आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे....
विना तिकीट AC कोचमध्ये शिरला, अर्धनग्न होत गोंधळ घातला; पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात
दोघांना दांडक्याने मारहाण, ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास भाग पाडले…; बेंगळुरूमध्ये FIR दाखल
Axiom Mission 4 – हिंदुस्थानसाठी दुसरा ‘राकेश शर्मा’ क्षण! शुभांशू शुक्ला 41 वर्षांनंतर अंतराळासाठी रवाना
Breaking – Mission Axiom 4 ‘कमाल की राईड’ म्हणत शुंभाशू शुक्लाचा अंतराळ यानाचा प्रवास सुरू
ठाणे पालिकेच्या भ्रष्टाचाराची पहिली विकेट पडली; तत्कालीन सहाय्यक आयुक्त फारूख शेख निलंबित, न्यायालयाच्या दणक्यानंतर आयुक्त ‘इन अॅक्शन
सहा दिवसांत 73 बेकायदा बांधकामांवर हातोडा, ठाण्यातील भूमाफियांचे धाबे दणाणले