सेक्स रॅकेट प्रकरण : खेडशीतील गौरव लॉजवर सात दिवसात 86 जणांची हजेरी

सेक्स रॅकेट प्रकरण : खेडशीतील गौरव लॉजवर सात दिवसात 86 जणांची हजेरी

रत्नागिरीतील खेडशी येथे पोलिसांनी पकडलेल्या सेक्स रॅकेट प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या लॉजवर पोलिसांनी छापा टाकला होता, तिथे केवळ सात दिवसांत तब्बल 86 गिऱ्हाईक येऊन गेल्याचे उघड झाले आहे. प्रत्येक गिऱ्हाईकाकडून घेण्यात आलेली अर्धी रक्कम देहव्यापार करणाऱ्या महिलांना दिली जात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे 13 मे रोजी रात्री उशिरा ही कारवाई करत या देहव्यापाराचा पर्दाफाश केला होता. यावेळी पोलिसांनी देहव्यापार करणाऱ्या चार महिलांना ताब्यात घेतले. यातील दोन महिला गुजरातच्या, एक मुंबईची तर एक कर्नाटकची रहिवासी असल्याचे समोर आले आहे. पोट भरण्यासाठी हा व्यवसाय करत असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे.

या प्रकरणात अनैतिक व्यापार करणाऱ्या अरमान करीम खान (रा. कोकणनगर रत्नागिरी) यांच्यासह तीन संशयितांविरुद्ध अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, 1956 कायद्यांतर्गत रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य संशयित सलमान मुकादम हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;