IND Vs ENG 1st Test – इंग्लंडच्या सलामीवीरांनी केली ऐतिहासिक भागी, लीड्समध्ये 76 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत

IND Vs ENG 1st Test – इंग्लंडच्या सलामीवीरांनी केली ऐतिहासिक भागी, लीड्समध्ये 76 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत

लीड्समध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला जिंकण्यासाठी 90 षटकांत 350 धावांचे आव्हान दिले आहे. आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीविरांनी संयमी फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी 188 धावांची भागी केली आणि इतिहास रचला. हेंडिग्लेच्या या मैदानावर तब्बल 76 वर्षांनी हा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

सलामीला आलेल्या झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी इंग्लंडचा पाया पक्का केला आहे. झॅक क्रॉली (65) आणि बेन डकेट (149) या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 188 धावांची भागी करत 76 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. हेडिंग्लेच्या या मैदानावर कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात सलामीला आलेल्या फलंदाजांनी 188 धावांची रेकॉर्डब्रेक भागी केली आहे. यापूर्वी 1949 साली न्यूझीलंडच्या वर्दुन स्कॉट आणि बर्ट सुटक्लिफ यांनी चौथ्या डावात पहिल्या विकेटसाठी 112 धावांची भागी याच मैदानावर केली होती. त्यानंतर हा विक्रम कोणालाही मोडता आला नव्हता. परंतु आता झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याचबरोबर घरच्या मैदानावर खेळताना सर्वाधिक धावांची भागी करण्याचा विक्रम सुद्धा झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी आपल्या नावावर केला आहे. 24 वर्षांपूर्वी मार्कस ट्रेस्कोथिक आणि मायकेल आथर्टन यांनी 2001 साली पाकिस्तानविरुद्ध ओल्ट ट्रॅफर्ड येथे 146 धावंची विक्रमी भागी केली होती. आता झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी हा सुद्धा विक्रम मोडीत काढला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;