Latur News – एक लाखांच्या वाळूसह तब्बल 1 कोटींहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त; 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

Latur News – एक लाखांच्या वाळूसह तब्बल 1 कोटींहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त; 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

वाळूचा साठा करून अवैधरित्या विक्री करण्यासाठी ठेवण्यात आलेली अंदाजे 20 ब्रास वाळू धाड टाकून पकडण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एक लाख रुपये किंमतीच्या वाळूसह 1 कोटी 46 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर या कारवाईत एकूण 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बी चंद्रकांत रेड्डी सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग चाकुर यांना मिळालेल्या  माहितीवरुन त्यांनी त्यांच्या कार्यालयातील पोलीस अंमलदारांचे पथक तयार केले होते. या पथकाने खासगी वाहनाने घटनास्थळी जात छापा मारला. यावेळी मौजे लातूर-नांदेड रोडच्या पश्चिम बाजूस राळगा शिवारात असलेल्या सखाराम नामदेव राठोड याच्या शेतात अंदाजे 20 ब्रास वाळू आढळून आली. या वाळूचा अवैधरित्या साठा करुण ठेवण्याता आला होता. पोलिसांनी सर्व वाळू जप्त केली. त्याचबरोबर वाळू भरण्यासाठी वापरण्यात आलेल्या 2 जेसेबी, 4 हायवा टिप्पर, 1 बोलेरो, आरोपींचे मोबाईल आणि 21,500 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 1 कोटी 46 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल आकनगीरे यांच्या फिर्यादीवरून 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये प्रशांत महेद्र आगलावे, ओमकार सुग्रीव जाभाडे, सगमेश्वर निवृत्ती नरवटे, संतोष सतिष शेळके, सखाराम नामदेव राठोड, शेख फत्तूसाब इस्माइल, प्रशांत उत्तम नाटे, भैयासाहेब बळीराम कांबळे, संतोष कुलाल, सोमनाथ माळी, दस्तगीर पठाण, संगम राजकुमार कदम यांचा समावेश आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनुर अहमदपूर यांच्याकडे देण्यात आला आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;