वेबसीरिज – मुली पटवण्याचे क्लासेस

वेबसीरिज – मुली पटवण्याचे क्लासेस

>> तरंग वैद्य

एक वेगळा विषय, काहीशा विनोदी पद्धतीने हाताळला आहे, जो खेळकर आणि खोडकर दोन्ही आहे. त्यामुळे निश्चितच आपलं मनोरंजन करेल, तर `प्यार का प्रोफेसर’च्या वर्गात एकदा बसून तर बघा.

‘प्यार का प्रोफेसर’ नावाची 6 भाग असलेली वेब सीरिज एक वेगळाच विषय घेऊन मॅक्सप्लेयर- अॅमेझॉन प्राईमवर 14 फेब्रुवारी, 2025 ला दाखल झाली आहे. प्रेम कसे करायचे हे शिकवणारे अनेक चित्रपट यापूर्वीही आले आहेत. त्यामुळे यात नवीन काय असणार असे वाटणे स्वाभाविक आहे, पण वेगळेपण निश्चितच आहे. हल्ली कुठलीही माहिती हवी असेल तर `गुगल’ आणि काही शिकायचे असेल तर `क्लासेस.’ तबला, कराटे, प्रभावी बोलणे शिकवणारे वर्ग आणि त्यांच्या जाहिराती आपण बघतोच त्यात `पोरी पटवायचे’ क्लासेस असण्यात नवल वाटण्यासारखे काहीच नाही. या मालिकेतील मुख्य पात्राचा हाच व्यवसाय आहे.

नायक वैभव चक दिल्लीचा राहणारा असून तो दिवसा प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवण्याचे धडे देत असतो. प्रत्येक पुरुषाला काय किंवा स्त्रीला काय, आपले चालणे-बोलणे, उठणे-बसणे प्रभावी असावे जेणेकरून समोरच्याला आपण प्रभावित करू शकू, आकर्षित करू शकू असे  वाटत असते. हल्लीच्या स्पर्धेच्या जगात ही गरज पण आहे. त्यामुळे त्याचे छान चाललेलं असतं, पण तो इतक्यावरच गप्प बसत नसतो. तो रात्री “पोरी कश्या पटवायच्या” याचे क्लासेस घेत असतो आणि बक्कळ कमाई करत असतो. एके दिवशी आपल्या दिवसाच्या क्लासमध्ये एका नेत्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ दाखवून तो त्या नेत्याची टेर खेचतो. त्या नेत्याला बोलण्याची, उठण्या-बसण्याची अजिबात माहिती नसून तो गावंढळ आहे असे सांगत आपल्या विद्यार्थ्यांसमोर आपला प्रभाव पाडतो आणि त्याचा हा क्लास किती महत्त्वाचा आहे हे पटवून द्यायचा प्रयत्न करतो. ही गोष्ट आणि तो व्हिडीओ या नेत्यापर्यंत पोहोचते. आपली मस्करी करतोय हे पाहून तो नेता बिथरतो व आपल्या गुंडांना वैभवला उचलून आणण्याचे आदेश देतो.

घाबरलेला वैभव या नेत्याला ज्याचे नाव पंकज हुडा असतं आपण मस्करीत हे सगळं केलं असून माफी मागतो, पण हुडाच्या मनात काही वेगळंच चाललं असतं. त्याला माहीत असतं की, तो गावंढळ आहे, ज्याचा परिणाम त्याच्या `इमेज’वर होत आहे. काही महिन्यातच होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारात तो आपली आकर्षक इमेज घेऊन लोकांसमोर जाण्यासाठी इच्छुक असतो आणि तो वैभवला आपला शिक्षक म्हणून नेमतो. वैभवला हो म्हणण्याशिवाय पर्यायच नसतो. तसंच वैभव हुडाची सुंदर सेक्रेटरी मल्लिकाकडे आकर्षित झालेला असतो. पुढे मल्लिका हुडाची बायको आहे हे कळते आणि गंमत आणखीन वाढते.

आजच्या राजकारणात निवडणूक जिंकण्यासाठी मतपेटीत आपल्या उमेदवाराच्या नावाची जास्तीत जास्त मते कशी पडतील यासाठी कुठल्या क्लृप्त्या लढवते हे सर्व या मालिकेत मनोरंजक पद्धतीने दाखवले आहे. संपूर्ण कथा याच पद्धतीने पुढे जाते, ज्यातून वैभवची दोन्ही कामे व्यवस्थित सुरू आहेत हे हुशारीने दाखवले आहे.

संदीपा धर ही अभिनेत्री सोडली तर इतर कलाकार नवीन आहेत. तिचा अभिनय आणि दिसणं दोन्ही सुंदर. प्रणव सचदेव प्रोफेसरच्या भूमिकेत खूप सहज वाटला आहे. घाबरलेल्या परिस्थितीतही आत्मविश्वास दाखवला की, परिस्थिती हाताळता येते हे या मालिकेतून शिकायला मिळते. संपूर्ण मालिकेत तो आत्मविश्वासाने वावरला आहे. महेश बलराज या अभिनेत्याला पंकज हुडा या राजनेत्याची भूमिका मिळाली आहे. एकप्रकारे हे पात्र मालिकेचे मुख्य पात्र आहे. त्यामुळे त्याचा अभिनय चांगला असणं आवश्यक होतं. इतर कलाकार आपापल्या भूमिकेत योग्य आहेत.

[email protected]

(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उपचारादरम्यान वाघाचा प्राणीरक्षकावर हल्ला उपचारादरम्यान वाघाचा प्राणीरक्षकावर हल्ला
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वैद्यकीय पिंजऱ्यामध्ये उपचार करतेवेळी टी-5 या वाघाने प्राणीरक्षकावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या रक्षकाने...
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दोघांना जामीन मंजूर, शिलाँग कोर्टाचा निर्णय
Pune News – बारामती पालखी महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
IND vs ENG 3rd Test – टीम इंडियाची घोडदौड 387 धावांवर थांबली, तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त; इंग्लंडने घेतली आघाडी
Baloch Army Attack – बलूच सैन्याच्या हल्ल्यात 50 पाकिस्तानी सैनिक ठार, बीएलएफचा दावा
Jammu Kashmir – एसयूव्ही कार 600 फूट दरीत कोसळली, 5 जणांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
Ratnagiri News – पळवून लावलं तरी बिबट्या गुरांच्या गोठ्यातच येऊन बसायचा, अखेर वनविभागाने केले जेरबंद