साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 25 मे 2025 ते शनिवार 31 मे 2025

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 25 मे 2025 ते शनिवार 31 मे 2025

>> नीलिमा प्रधान

मेषलोकप्रियता वाढेल

राहु कुंभेत वक्री, केतु सिंहेत वक्री, स्वराशीत शुक्र साडेसातीचे पर्व सुरू आहे. तुमच्य्या क्षेत्रात प्रगती कराल, नवीन संधी मिळेल. नोकरीमध्ये कह्णीण काम करून दाखवाल, बढती- परदेशात जाण्याची संधी. धंद्यात लाभ-वाढ-वाद टाळा- कर्ज मिळवा. राजकीय्य्य सामाजिक क्षेत्रात प्रति÷ा, लोकप्रिय्यता वाढेल, परंतु उत्साहाच्या भरात अथवा रागात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका.  चौफेर सावध राहा.
शुभ दि. 28, 29

वृषभविचारांना दिशा मिळेल

कुंभेत राहु व सिंहेत केतु वक्री. वृषभेच्या व्ययेषात शुक्र. आत्मविश्वास वाढवणाऱया घटना घडतील. नवीन ओळखीवर जास्त विश्वास ठेवू नका. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी राखता येईल. धंद्यात उधारी देऊ नका, नवे काम मिळवता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात थोरामोठय़ांचा सहवास-विचारांना दिशा मिळेल, ज्ञानात भर पडेल. गुप्तता ठेवा. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. व्यसन नको.

शुभ दि. 29, 30

मिथुनडोळय़ांची काळजी घ्या

कुंभेत राहु व सिंहेत केतु वक्री. मिथुनेच्या एकादशात शुक्र. डोळय़ांची काळजी घ्या, अनाठायी पैसा खर्च होऊ शकतो. मोठेपणाच्या आहारी न जाता वागा म्हणजे चूक टाळता येईल. प्रत्येक ठिकाणी बोलताना कायद्याच्या कक्षा समजून घ्या. नोकरीत शुल्लक तणाव. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांचा दबाव राहील. तुमचे गुपित उघड होण्याची संभावना. व्यवहारात नुकसान टाळता येईल.
शुभ दि. 30, 31

 कर्करागावर नियंत्रण ठेवा

कुंभेत राहु व सिंहेत केतु वक्री. कर्केच्या दशमेषात शुक्र, रागावर नियंत्रण ठेवल्यास समस्या कमी निर्माण होतील व स्वतःची कामे करून घेता येतील. धंद्यात प्रगती. नवा करार विचारपूर्वक करा. नोकरीमध्ये प्रभाव. कामांची प्रशंसा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा-लोकप्रियता वाढेल. गुप्त कारवायांवर चांगली नजर ठेवा. योग्य व्यक्तीचाच सल्ला घ्या. योजनापूर्तीकडे दुर्लक्ष नको.

शुभ दि. 25, 26

सिंहप्रकृतीकडे दुर्लक्ष नको

कुंभेत राहु व सिंहेत केतु वक्री. सिंहेच्या भाग्येषात शुक्र राश्यांतर. तुटक व कठोर बोलणे टाळल्यास प्रत्येक कामात यश मिळेल. गुप्त कायवायांवर नजर ठेवा म्हणजे धोका टाळता येईल. प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. नोकरीत कामाची हुशारी दाखवाल. स्पर्धेत यश. नवीन ओळख तपासून घ्या. धंद्यात सुधारणा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात धोरण बदलावे लागण्याची शक्यता. विरोधक मैत्रीसाठी संपर्कात येतील.

शुभ दि. 28, 29

कन्याचातुर्याने गोड बोला

कुंभेत राहु व सिंहेत केतु वक्री. कन्येच्या अष्टमेषात शुक्र. कठीण कामे करून घेता येतील. चातुर्याने गोड बोलून राहिल्यास प्रश्न गंभीर स्वरूप धारण करणार नाही. नोकरीत प्रभाव वाढेल, चांगला बदल. धंद्यात उधारी देऊ नका, धंद्यात वाढ-लाभ. राजकीय-सामाजिक क्षेत्रात शुल्लक वाटणारी व्यक्ती निष्कारण समस्या करेल तेव्हा सावध रहा, प्रतिष्ठा-मान टिकून ठेवता येईल. व्यसन नको. स्पर्धेत प्रगती.

शुभ दि. 29, 30

तूळकायदा पाळा

कुंभेत राहु व सिंहेत केतु वक्री. तुळेच्या सप्तमेषात शुक्र. तुमचे बोलणे सत्य असले तरी ओठावर आणण्याचा फायदा होणार नाही, फक्त तणाव-गैरसमज होईल. कायदा पाळा. नोकरीमध्ये दबाव राहील, विरोधक खेळी खेळतील. धंद्यात गोड बोला, फसगत टाळा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या विरोधात जाऊ नका, मुद्दे नम्रपणे मांडा. अन्यथा तटस्थ भूमिका घ्या, निरीक्षण करा. संधी वाट पहा.

शुभ दि. 30, 31

वृश्चिकसावध भूमिका घ्या

कुंभेत राहु व सिंहेत केतु वक्री. वृश्चिकेच्या षष्ठेशात शुक्र जुना वाद पुन्हा नव्याने निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या क्षेत्रात सावध भूमिका घ्या. नोकरीत प्रतिस्पर्धी काडय़ा घालतील, वर्चस्व टिकवता येईल. धंद्यात अरेरावी नको, वसुली करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात कुणालाही कमी लेखून चालणार नाही, प्रतिष्ठा सांभाळता येईल. योजनांना पूर्ण करा. प्रकृतीची काळजी घ्या. गुप्तता राखा.

शुभ दि. 27, 31

धनुनोकरी टिकवा

कुंभेत राहु व सिंहेत केतु वक्री. धनुच्या पंचमेषात शुक्र. प्रवासात-काम करताना सावध राहा, दुखापत होईल. रागावर ताबा ठेवल्यास कोणताही कठीण प्रश्न सोडवता येईल. नोकरी टिकवा, धंद्यात वाद नको. राजकीय-सामाजिक क्षेत्रात चर्चेतून वाद निर्माण होत असेल तर माघार घ्या. अरेरावी, हट्टीपणा, संताप नको, प्रतिष्ठा जपा, मानसिक-शारीरिक त्रास वाढवून घेऊ नका. संधीची वाट पहा. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा.

शुभ दि. 29, 30

मकरनोकरीत व्याप वाढेल

कुंभेत राहु व सिंहेत केतु वक्री. मकरेच्या सुखेषात शुक्र. विरोधाचा विरोधक म्हणून विचार न करता स्वतःमध्ये कोणता चांगला बदल करता येईल ते शोधा. म्हणजे अधिक चांगली प्रगती करता येईल, नोकरीत व्याप. मैत्री टिकवा. धंद्यात संताप नको, गोड बोला. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा जपता येईल, तुमच्या कार्याचे कौतुक होईल असे समजू नका, वरिष्ठ नवी आाफर देतील. राजकीय गणित समजून घ्या.

शुभ दि. 26, 31

कुंभजपून शब्द वापरा

कुंभेत राहु व सिंहेत केतु वक्री. कुंभेच्या पराक्रमात शुक्र. हाती घेतलेल्या कामात तात्पुरत्या स्वरूपाच्या अडचणी येतील, विरोधक डावपेच टाकतील. नोकरीमध्ये कामात गोंधळ करू नका. धंद्यात सहनशीलता ठेवा. वसुली करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात विरोधकांच्या चुका दाखवताना अत्यंत नम्रता ठेवा, जपून शब्द वापरा. आरोप तुमच्यावरच टाकले जातील, म्हणून बेसावध राहू नका. खतरा छुपा है.

शुभ दि. 25, 29

मीनलोकसंग्रह वाढेल

कुंभेत राहु व सिंहेत केतु वक्री. मीनेच्या धनेषात शुक्र. कोणतेही कठीण काम करून घेता येईल. आळस नको, रागावर ताबा ठेवा. नोकरीमध्ये प्रभाव दाखवाल. संततीसमवेत तणाव. धंद्यात गोड बोला, काम मिळवा, वसुली करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचा निर्णय मानला जाईल, महत्त्व वाढेल, लोकसंग्रह वाढेल. पद-प्रतिष्ठा मिळेल. खाण्याची काळजी घ्या. आसिडिटी वाढेल.

शुभ दि. 28, 31

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

थोडक्यात बचावली जिनिलिया; ड्रायव्हरकडून घडली एक चूक, पण जिनिलियाच्या वागण्याने जिंकली सर्वांची मने थोडक्यात बचावली जिनिलिया; ड्रायव्हरकडून घडली एक चूक, पण जिनिलियाच्या वागण्याने जिंकली सर्वांची मने
बॉलिवूडमधील अभिनेत्रींसोबत असे अनेक किस्से घडतात की ते कॅमेऱ्यात कैद होतात. असाच एक किस्सा घडला आहे अभिनेत्री जिनिलिया डिसूझा देशमुखसोबत....
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकड्यांची टरकली; हिंदुस्थानच्या धास्तीने संरक्षण बजेटमध्ये वाढ
ठाकरे बंधू एकत्र येणार, पडदा कधी उघडणार? संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले…
Bullet Train : एकदम सुपरफास्ट….या दिवशी बुलेट ट्रेन धावणार, तारीख जाहीर, मुंबईपर्यंत केव्हा पूर्ण होणार काम
‘हेरा फेरी 3’मधून बाहेर पडण्याबाबत अखेर परेश रावल यांनी सोडलं मौन; म्हणाले ‘माझं उत्तर..’
या चित्रपटात दीपिका पदुकोणची जागा आता तृप्ती डिमरी घेणार; नेमकं कारण काय?
पाणावलेल्या डोळ्यांनी राहुलने भाऊ मुकुल देवला दिला अंतिम निरोप; विंदु दारा सिंहलाही अश्रू अनावर