आरटीओने ताब्यात घेतलेली शेकडो वाहने धूळ खात, हायकोर्टाच्या आदेशानंतर ई-लिलाव प्रक्रियेला गती

आरटीओने ताब्यात घेतलेली शेकडो वाहने धूळ खात, हायकोर्टाच्या आदेशानंतर ई-लिलाव प्रक्रियेला गती

मुंबईतील प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (आरटीओ) विविध कारणांवरून ताब्यात घेतलेली शेकडो वाहने धूळ खात पडून आहेत. उच्च न्यायालयाने मुंबई वाहतूक पोलिसांना जप्त गाडय़ांची विल्हेवाट लावण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. त्यानंतर आरटीओनेही धूळ खात पडलेल्या वाहनांचा ई-लिलाव करण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. पुढील आठवडाभरात त्या वाहनांचा लिलाव करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सर्व प्रकारच्या वाहनांनी वाहतूक नियमांनुसार अधिपृत कर भरणे बंधनकारक आहे. संबंधित कर वसुलीची जबाबदारी आरटीओमार्फत पार पाडली जाते. ज्या वाहनांचा कर वेळीच भरला जात नाही ती वाहने आरटीओ ताब्यात ठेवते. अशा कारवाईत ताब्यात घेतलेली शेकडो वाहने ताडदेव, वडाळा, अंधेरी व बोरिवली आरटीओ कार्यालयांच्या आवारात धूळ खात आहेत. न्यायालयाने जप्त केलेल्या वाहनांची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरटीओनेही ताब्यातील वाहनांचा लिलाव करण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे.

z आरटीओकडे आधीच जागेची कमतरता आहे. अशा स्थितीत ताब्यात घेतलेल्या वाहनांचा लिलाव, भंगारात काढणे किंवा वाहनाच्या मूळ मालकाकडून कर वसूल करून वाहनाचा वेळीच ताबा देणे या प्रक्रियांना गती देण्याची गरज आहे, असे वाहतूक क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.

आरटीओची कारवाई

अधिपृत वाहन कर भरला नसेल, वाहनाची नोंदणी संपली असेल, पासिंग केले नसेल अशा विविध प्रकरणांत संबंधित वाहने आरटीओ आपल्या ताब्यात ठेवते. वाहनधारकांना विशिष्ट मुदत दिली जाते. त्यात नियमांची पूर्तता न केल्यास वाहनांचा लिलाव केला जातो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

थोडक्यात बचावली जिनिलिया; ड्रायव्हरकडून घडली एक चूक, पण जिनिलियाच्या वागण्याने जिंकली सर्वांची मने थोडक्यात बचावली जिनिलिया; ड्रायव्हरकडून घडली एक चूक, पण जिनिलियाच्या वागण्याने जिंकली सर्वांची मने
बॉलिवूडमधील अभिनेत्रींसोबत असे अनेक किस्से घडतात की ते कॅमेऱ्यात कैद होतात. असाच एक किस्सा घडला आहे अभिनेत्री जिनिलिया डिसूझा देशमुखसोबत....
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकड्यांची टरकली; हिंदुस्थानच्या धास्तीने संरक्षण बजेटमध्ये वाढ
ठाकरे बंधू एकत्र येणार, पडदा कधी उघडणार? संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले…
Bullet Train : एकदम सुपरफास्ट….या दिवशी बुलेट ट्रेन धावणार, तारीख जाहीर, मुंबईपर्यंत केव्हा पूर्ण होणार काम
‘हेरा फेरी 3’मधून बाहेर पडण्याबाबत अखेर परेश रावल यांनी सोडलं मौन; म्हणाले ‘माझं उत्तर..’
या चित्रपटात दीपिका पदुकोणची जागा आता तृप्ती डिमरी घेणार; नेमकं कारण काय?
पाणावलेल्या डोळ्यांनी राहुलने भाऊ मुकुल देवला दिला अंतिम निरोप; विंदु दारा सिंहलाही अश्रू अनावर