Operation Sindoor- S-400 हिंदुस्थानच्या आकाशातील सर्वात घातक शिकारी! यानेच सीमेवर पाकिस्तानी क्षेपणास्त्रे केली गिळंकृत, वाचा

Operation Sindoor- S-400 हिंदुस्थानच्या आकाशातील सर्वात घातक शिकारी! यानेच सीमेवर पाकिस्तानी क्षेपणास्त्रे केली गिळंकृत, वाचा

हिंदुस्थानने जम्मू आणि कश्मीरमधील पहलगाममधील हल्ल्याचा बदला घेतला आहे. सैन्याने पाकिस्तानला योग्य उत्तर दिले असून, सशस्त्र दलांनी शेजारच्या देशातील प्रमुख दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. दरम्यान हिंदुस्थानी लष्कराने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. खरंतर लष्कराने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 7 आणि 8 मे 2025 च्या मध्यरात्री पाकिस्तानने श्रीनगर, जम्मू, अवंतीपुरा, अमृतसर, कपूरथला, पठाणकोट, जालंधर, लुधियाना, आदमपूर, चंदीगड, नल, बठिंडा, फलोदी, भुज आणि इतर अनेक लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याची योजना आखली होती. पण लष्कराने पाकिस्तानचा हल्ला करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. यासाठी हिंदुस्थानने प्रथमच एस-400 चा वापर केला आहे. S-400 क्षेपणास्त्र किती शक्तिशाली आहे हे जाणून घेऊया.

 

Operation Sindoor- पाकिस्तानकडून लष्करी हल्ला झाल्यास त्याला कठोर उत्तर मिळेल- परराष्ट्रमंत्री एस जयशंकर

एस-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विशेषतः चीन आणि पाकिस्तानला लक्षात ठेवून तैनात करण्यात आली आहे. त्याची रेंज 40 ते 400 किमी दरम्यान आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या भेटीदरम्यान हिंदुस्थान आणि रशियामध्ये या S-400 क्षेपणास्त्र तंत्रज्ञानासाठी करार झाला होता. सध्या, हे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान जगातील सर्वात शक्तिशाली संरक्षण प्रणाली मानले जाते. हिंदुस्थानने रशियाकडून सुमारे पाच अब्ज डॉलर्समध्ये ते खरेदी करण्याचा करार केला होता आणि हिंदुस्थानने पाच क्षेपणास्त्र खरेदी केले आहेत.

एस-400 किती शक्तिशाली आहे?
एस-400 क्षेपणास्त्र शत्रूंसाठी सर्वात धोकादायक मानले जाते. विशेष म्हणजे त्याची स्थिती निश्चित नाही. ज्यामुळे ते सहज शोधता येत नाही. तसेच, त्यात बसवलेली रडार प्रणाली खूप प्रगत आहे. एस-400 हे क्षेपणास्त्रे 400 किमी अंतरापर्यंत अचूकतेने हल्ला करू शकतात आणि शत्रूंचा नाश करण्यासाठी एका वेळी 72 क्षेपणास्त्रे डागू शकतात. याशिवाय, त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे क्षेपणास्त्र -50 अंश ते उणे 70 अंश तापमानात काम करू शकते.

लढाऊ विमान
एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील सर्वात शक्तिशाली शस्त्र मानली जाते. भारतातील कोणत्याही संभाव्य हवाई हल्ल्याला हाणून पाडण्यासाठी त्याची हवाई संरक्षण प्रणाली प्रभावी आहे. अहवालानुसार, त्याची मारक क्षमता इतकी घातक आहे की ती प्रगत लढाऊ विमानांनाही नष्ट करू शकते.

एस-400 क्षेपणास्त्र 100 फूट ते 40,000 फूट उंचीवरील लक्ष्य सहजपणे टिपू शकते आणि मारा करू शकते, तर हे क्षेपणास्त्र कुठेही नेऊन नष्ट करणे सोपे नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सचिनच्या लेकीला वाटते ‘या’ गोष्टीची सर्वात जास्त भीती; साराचं उत्तर जाणून आश्चर्य वाटेल सचिनच्या लेकीला वाटते ‘या’ गोष्टीची सर्वात जास्त भीती; साराचं उत्तर जाणून आश्चर्य वाटेल
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर तिचे व्हॅकेशन आणि कामाशी संबंधित अपडेट्स शेअर...
अंगाला लागलेल्या हळदीसह नवरदेव जवान सीमेवर हजर, नवरी म्हणाली ‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझे कुंकू पाठवतेय
Operation Sindoor- लढाऊ गणवेशात अवतरल्या हिंदुस्थानच्या रणरागिणी!
रत्नागिरी – पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्याला चोपले
Operation Sindoor- जय हिंद! हिंदुस्थानी सैन्याची ही आहे बलाढ्य शक्ती, पाकिस्तानला आता पळता भुई थोडी
Operation Sindoor – आमच्या सहनशिलतेचा कोणीही गैरफायदा घेऊ नये, अन्यथा सणसणीत प्रत्युत्तर मिळेल; राजनाथ सिंहांचा पाकला खणखणीत इशारा
Operation Sindoor ‘आम्ही गुन्हेगार आहोत, अल्लाह आमची हिफाजत कर’ पाकिस्तानी खासदार संसदेत ढसाढसा रडला