पत्नीच्या निधनानंतर, बॉलिवूड अभिनेता 18 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत लिव्ह-इनमध्ये; म्हणाला “कशाला हवंय लग्न…”
बॉलिवूडमध्ये अफेअर ,घटस्फोट किंवा लिव्ह-इन या गोष्टी अगदीच कमी सामान्यबाब आहे. असाच एक बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे जो गेल्या 9 ते 10 वर्षांपासून एका अभिनेत्रीसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय. आणि मुख्य म्हणजे ही अभिनेत्री त्याच्यापेक्षा तब्बल 18 वर्षांनी लहान आहे.
बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा खलनायक म्हणून प्रसिद्ध
नकारात्मक भूमिकांमधून नाव कमावणारा चित्रपटसृष्टीतील हा अभिनेता म्हणजे राहुल देव. राहुलचा जन्म 27 सप्टेंबर 1968 रोजी दिल्ली येथे झाला. त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी फार कमी जणांना माहित आहे. राहुल देवने त्यांचे संपूर्ण शिक्षण दिल्लीतून घेतलं आहे आणि त्याचे वडील सहाय्यक पोलिस आयुक्त होते. पण त्याचा भाऊ मुकुल देव अभिनयाच्या जगात होता आणि त्यामुळे राहुल देव देखील अभिनयाकडे वळाला.
राहुल देवने 2000 मध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रवेश केला. त्याने चॅम्पियन चित्रपटात काम केले. या चित्रपटात सनी देओल आणि मनीषा कोइराला एकत्र दिसले होते. या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारून राहुल देव चर्चेत आला. यानंतर, तो अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाचीच भूमिका साकारताना दिसला आणि त्याला लोकप्रियताही मिळाली.
पत्नीच्या निधनानंतर 18 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत लिव्ह-इन
राहुल देवने रीना नावाच्या मुलीसोबत लग्न केलं होतं. त्या दोघांना एक मुलगाही झाला. पण 2009 मध्ये कर्करोगामुळे त्याच्या पत्नीचे निधन झालं. ज्यामुळे राहुल देव पूर्णपणे तुटले होते. त्याला समजत नव्हते की तो त्याच्या 11 वर्षाच्या मुलाला कसे वाढवावं. पण एकदा राहुल अभिनेत्री मुग्धा गोडसेची अशीच भेट झाली होती. मुग्धा गोडसे राहुलपेक्षा तब्बल 18 वर्षांनी लहान आहे. पण दोघांनाही एकमेकांचे स्वभाव इतके आवडले की त्यांच्यात खूप घट्ट मैत्री निर्माण झाली. हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली आणि2015 मध्ये दोघांनीही त्यांचे नाते अधिकृत केले. तथापि, दोघांनीही अद्याप लग्न केलेले नाही आणि ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. राहुल आता 56 वर्षांचा असून मुग्धा 38 वर्षांची आहे.
‘लग्न करण्याची काय गरज…’
राहुल आणि मुग्धा दोघांनीही लग्नाबद्दल सांगितलं की आम्हाला लग्नाची गरज वाटत नाही कारण आम्ही या आयुष्यात पूर्णपणे आनंदी आहोत. राहुल यावर म्हणाला होता की, “आम्ही लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. जर दोघं जण एकमेकांसोबत आनंदी आहेत तर लग्न करणं गरजेचं नाही. लग्न केलं काय अन् नाही केलं काय काहीही फरक पडत नाही.” तसेच दोघांमध्ये 14 वर्षांचं अंतर आहे. यावर मुग्धा म्हणाली होती की, ‘मला कधीच आमच्या वयातील अंतराची जाणीव झाली नाही. तुमचं जर त्या व्यक्तीवर प्रेम असेल तर इतर गोष्टी महत्वाच्या वाटत नाहीत.’
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List